शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

यवतमाळ बाजार समितीत ‘परिवर्तन’

By admin | Updated: October 11, 2016 02:43 IST

सहकार क्षेत्रात सलग दहा वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या गाडे पाटील गटाला यवतमाळ बाजार

गाडे पाटलांचा धुव्वा : मांगुळकर गटाला सर्व जागा यवतमाळ : सहकार क्षेत्रात सलग दहा वर्ष निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या गाडे पाटील गटाला यवतमाळ बाजार समितीत प्रचंड हादरा बसला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादीच्या परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व १९ जागांवर विजय मिळविला आहे. सत्ताधारी गाडे पाटील गटाला एकही जागा मिळविता आली नाही. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारात सहकारी संस्था मतदारसंघात रवींद्र ढोक (२६१), गजानन डोमाळे (२५८), किशोर इंगळे (२५६), वसंत भेंडेकर (२५४), गुणवंत डोळे (२५१), राजेंद्र गिरी (२४८), सुरेश पात्रीकर (२३५) सर्वसाधारण प्रवर्गातून विजयी झाले. याच मतदारसंघातील महिला राखीव प्रवर्गातून छाया शिर्के (२८०), ललिता जयस्वाल (२६६), इतर मागासवर्गीयातून श्रीकांत डंभारे (२५५), विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातून संजय राठोड (२६३) विजयी झाले. ग्रामपंचात मतदारसंघात रमेश भिसनकर (३२८), सत्यभामा चव्हाण (३२९), सुनिल डिवरे (३३२), प्रकाश राठोड (३०६) विजयी झाले. हमाल मापारी मतदारसंघातून किशोर बडे (९८), व्यापारी अडते मतदारसंघातून विजय मुंधडा (६६), राजेंद्र निमोदिया (६५) विजयी झाले. परिवर्तन पॅनलच्या विजयाची सुरूवातच ही पणन प्रक्रिया मतदारसंघातून झाली. राजेशकुमार फुलचंद अग्रवाल अविरोध निवडून आले. गाडे पाटील गटाच्या शेतकरी विकास आघाडीला एकही जागा राखता आली नाही. विद्यमान सभापती डॉ. सूर्यकांत गाडे पाटील यांचा सहकारी संस्था मतदार संघात दणदणीत पराभव झाला. ग्रामपंचायत मतदारसंघात परिवर्तनच्या उमेदवारांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. मात्र सहकारी संस्था मतदारसंघात गाडे पाटील गटाच्या उमेदवारांनी चिवट झुंज दिली. मात्र विजयाचा आकडा गाठता आला नाही. येथील गुरुदेव मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढून जल्लोष केला. (कार्यालय प्रतिनिधी) सभापती काँग्रेसचा, उपसभापती शिवसेनेचा ४बाजार समितीत कॉंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी समर्थित परिवर्तन पॅनलकडून सत्ता स्थापन केली जाणार आहे. यामध्ये निवडणुकीपूर्वी ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार सभापती पद काँग्रेकडे आणि उपसभापती पद शिवसेनेकडे राहणार आहे. त्यांची निवड प्रक्रिया केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ४यवतमाळ बाजार समिती जिल्हात सर्वात मोठी असून मुख्यालयी असल्याने इथे सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपाची सहकारात बांधणीच नाही. केवळ गाडे पाटील गटामुळे भाजपाची सहकार क्षेत्रात एंट्री झाली. मात्र तिथेही त्यांना पराभवच स्वीकारावा लागला. राज्यमंत्री असतानासुध्दा सहकार क्षेत्रातील बांधणी भाजपाने केलेली नाही. त्यामुळेच भाजपाची सहकारातील एंट्री फसल्याचे राजकीय जाणाकारांकडून बोलले जात आहे.