लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी)मराठी भाषेच्या संवर्धनाची व संगोपनाची काळजी वाहण्याच्या काळात या भाषेचे समृद्धपण अनुभवता यावे व तिची महती कळावी यासाठी यवतमाळातील विविध शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.शनिवारी सकाळपासून संमेलनस्थळी शाळेचे युनिफॉर्म घातलेल्या मुलामुलींचा किलबिलाट ऐकू येत होता. कुठे कवी संमेलन सुरू आहे. कुठे व्यंगकवितांचे प्रदर्शन भरले आहे.. कुठे महाराष्ट्रातील ज्येष्ठतम कवींच्या कवितांचे चित्रप्रदर्शन पाहता येते आहे.. या कवितांमध्ये ग्रेस, भा.रा. तांबे, शांता शेळके, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, बालकवी, इंदिरा संत, केशवसूत, बहिणाबाई, आरतीप्रभू आदींच्या उत्तमोत्तम कवितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्या कवितांसोबत संबंधित कवींचे सुरेख रेखाचित्र असल्याने विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या कवितांचे कवी कोण याचीही जाणीव होणार आहे.या सगळ््या साहित्य खजिन्याचा आनंद येथे शाळकरी मुलांसह अनेक वयोवृद्ध मराठीचे चाहतेही घेताना दिसत आहेत.
यवतमाळ मराठी साहित्य संमेलन; व्यंगचित्रे, किल्लेसंवर्धन, चित्रकविता आणि बरेच काही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 12:09 IST
मराठी भाषेच्या संवर्धनाची व संगोपनाची काळजी वाहण्याच्या काळात या भाषेचे समृद्धपण अनुभवता यावे व तिची महती कळावी यासाठी यवतमाळातील विविध शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
यवतमाळ मराठी साहित्य संमेलन; व्यंगचित्रे, किल्लेसंवर्धन, चित्रकविता आणि बरेच काही...
ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांसाठी माहिती व मनोरंजनाची पर्वणी