शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर तिघांचे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:15 IST

यवतमाळात बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.

ठळक मुद्देबोगस सोयाबीन, बनावट खत विक्रीचा ठपकाएका कृषी केंद्राला ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे विकणाऱ्या तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर बनावट खत प्रकरणात तीन कृषी केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला.परवाना निलंबित झालेल्यांमध्ये यवतमाळ शहराच्या दत्त चौक परिसरातील बबलू गुप्ता यांचे कृषी कल्पतरु, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र व राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सोयाबीन बियाणे जिल्ह्याबाहेर कोपरगाव-शिर्डी पर्यंत नेऊन विकल्याचा ठपका गुप्ता यांच्या कृषी कल्पतरु केंद्रावर आहे. त्यामुळे त्यांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर सुदर्शन व जाजू यांचा परवाना एक ते दोन महिन्यांसाठी निलंबित केला गेल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.

याशिवाय तीन कृषी केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले. महागाव तालुक्याच्या काळीदौलत येथील गौरी शंकर कृषी केंद्रावर बोगस सोयाबीन बियाणे विक्रीचा ठपका ठेवण्यात आला. नेर तालुक्याच्या मांगलादेवी येथील कृहनिका कृषी केंद्र आणि दिग्रस तालुक्याच्या तिवरा येथील बावणे कृषी केंद्राचा परवाना बनावट रासायनिक खत विकल्याप्रकरणी रद्द करण्यात आला आहे.

कृषी प्रगती केंद्रात अनेक त्रुट्यायवतमाळातील विलास बोगावार यांच्या कृषी प्रगती केंद्राला सक्त ताकीद देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या तपासणीत तेथे अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. मात्र त्या सौम्य स्वरूपाच्या होत्या. त्यातील बहुतांश त्रुट्यांची त्यांनी पूर्तता केली, साठा रजिस्टर भरले. त्यामुळे त्यांना केवळ ताकीद देण्यात आली.जिल्हाभर बोगस सोयाबीन बियाणे विकले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यवतमाळातील ठोक विक्रेत्यांकडून हे बियाणे विकले गेले. काहींनी कृत्रिम टंचाई करून जादा दराने बियाणे विकले तर कुणी जिल्ह्याबाहेर कंपनीतून परस्पर बियाणे विक्रीसाठी पाठविले. या वृत्ताची दखल घेऊन कृषी विभागाने शहरात ठोक बियाणे विक्रेत्यांच्या दुकान व गोदामांची तपासणी केली होती.परवाना रद्द व निलंबन केलेल्या प्रकरणात कृषी विभागाच्या तपासणीत अनेक गंभीरबाबी आढळून आल्या. साठा रजिस्टर न मिळणे, कागदपत्रे अपडेट नसणे, बियाणे खरेदी केल्याची कागदपत्रे उपलब्ध नसणे, जिल्ह्याबाहेर माल विकणे, उगवण क्षमता नसलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारणे आदी गैरप्रकार आढळून आले.

बनावट रासायनिक खताचा भंडाफोडकृषी विभागाने दिग्रस येथे बनावट रासायनिक खताची विक्री सुरू असल्याचा भंडाफोड केला होता. हे खत एसटी महामंडळाच्या पार्सल गाडीने गडचिरोली जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आणले जात होते व नामांकित खत म्हणून जादा दरात शेतकºयांच्या माथी मारले जात होते. हे खत विकणारे दोन कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले.यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक तक्रारीयवतमाळ व आर्णीतील ठोक बियाणे विक्रेत्यांकडून जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यात बियाण्यांची विक्री केली गेली. जयस्वाल कृषी केंद्रातून यवतमाळ तालुका व परिसरात बियाणे विकले गेले. तेथूनच बियाणे न उगविल्याच्या सर्वाधिक तक्रारी शेतकºयांनी नोंदविल्या.आर्णीतून बियाणे थेट उमरखेड व परिसरापर्यंत आर्णीच्या कृषी वैभव केंद्रातून उमरखेड व परिसरात सर्वाधिक बियाणे विक्री झाली व तक्रारीही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

मीडियाच्या एन्ट्रीने दत्त चौकातून पथक माघारीया तपासणीसाठी कृषी विभागाचे तत्कालीन मोहिम अधिकारी व दक्षता अधिकाऱ्यांचे पथक दत्त चौकातील जयस्वाल कृषी केंद्रावरही धडकले होते. मात्र त्याच वेळी तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाची चमू धडकल्याने कृषी विभागाने ही तपासणी नंतर करू असे म्हणून त्यावेळी कारवाई टाळली. परंतु नंतर या दुकानाची तपासणी झालीच नाही.

‘बीगबजेट’ पार्ट्याच तपासणीतून सुटल्या !अशाच पद्धतीने आर्णी येथील कृषी वैभव या ठोक बियाणे विक्रेत्याचीही तपासणी केली गेली नाही. ‘बीग बजेट’ पार्ट्याच कृषी विभागाच्या तपासणीतून सुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या केंद्रांना अभय देण्यामागील ‘रहस्य’ गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :agricultureशेती