शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ भूमीला दाद अन् कलावंतांना साद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:34 IST

अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांना स्वरांजली : राहुल देशपांडे चिमुकल्या शुभलक्ष्मीला देणार गायनाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली. विशेष म्हणजे, एका चिमुकल्या मुलीचे गायन चक्क त्यांनी मोबाईलमध्ये ‘शूट’ करून सोबत नेले.निमित्त होते बाबूजींच्या एकवीसाव्या स्मृतिसमारोहाचे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीसमारोहानिमित्त शनिवारी सायंकाळी राहुल देशपांडे यांचा ‘स्वरांजली’ कार्यक्रम येथील प्रेरणास्थळावर पार पडला.त्यावेळी शास्त्रीय रचना पेश करता-करता स्वरसम्राट राहुल देशपांडे यांनी यवतमाळकर रसिकांशी मोकळा संवादही साधला. ते म्हणाले, शास्त्रीय संगीत हे भारताचे वैभव आहे. मी त्याचा एक घटक असल्याचा मला अभिमान आहे. नव्या पिढीलाही भारतीय शास्त्रीय संगीताची माहिती असलीच पाहिजे. या कार्यक्रमापूर्वी यवतमाळच्या शुभलक्ष्मी प्रसाद कुळकर्णी या मुलीचे गायन मी ऐकले. तिचे गायन ताकदीचे आहे. माझे तिला आवाहन आहे, तिला आणि तिच्यासारख्या अनेक मुलांना शास्त्रीय संगीत शिकवायला मी तयार आहे. त्यासाठी मी एक पैसाही घेणार नाही. माझ्या गुरुजींनीही माझ्याकडून कधी पैसे घेतले नाही. पण यवतमाळातच असे गुरू तयार झाले पाहिजेत. एखाद्या मुलाने शास्त्रीय संगीत शिकण्याची इच्छा व्यक्त केली की लगेच या गुरुंची नावे सांगता आली पाहिजेत.ते म्हणाले, विदर्भ मला माझ्या घरासारखेच वाटते. माझे आजोबा (प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे) यांचे मूळ गाव मूर्तिजापूर. नंतर ते अमरावती जिल्ह्यात पूर्णानगरनजीकच्या मार्की येथे स्थायिक झाले. पुढे नागपूरमध्ये गेले. तेथून त्यांना लाहोरला जावे लागले होते. लाहोरमधून पुन्हा ते नागपुरातच परतले होते आणि नंतर पुण्याला स्थायिक झाले. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा विदर्भात येतो, तेव्हा आपल्या गावाच्या पंचक्रोशीत आल्यासारखा आपलेपणा वाटतो.बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळाविषयी राहुल देशपांडे म्हणाले, मी स्मारके अनेक पाहिली पण असे स्मारक पहिल्यांदाच बघता आले. कार्यक्रमापूर्वी मी हा संपूर्ण परिसर फिरून पाहिला. तेव्हा असे वाटले जणू मी युरोपातच फिरतोय! प्रत्येक गोष्टीची येथे छान मांडणी आहे. विशेष म्हणजे स्वरांजली कार्यक्रमानंतर राहुल देशपांडे यांनी प्रेरणास्थळावर वृक्षारोपणही केले.शंकरराव सांगळे यांचे स्मरणस्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘स्वरांजली’ मैफल सुरू होण्यापूर्वी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन विजय दर्डा यांनी प्राचार्य शंकरराव सांगळे यांचेही आवर्जुन स्मरण केले. ते म्हणाले, बाबूजींना जाऊन २१ वर्षे झाली. त्यांच्या प्रत्येक स्मृतिसमारोहाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे प्राचार्य शंकरराव सांगळे यांचे नुकतेच निधन झाले. विजय दर्डा यांनी उपस्थितांना आवाहन करताच शेकडो उपस्थितांनी उभे राहून शंकरराव सांगळे यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लोकमतचे एडिटर इन चिफ तथा माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, संचालक करण दर्डा, उषाताई दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Deshpandeराहुल देशपांडे