शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले

By admin | Updated: February 20, 2017 01:21 IST

घोड्यावर स्वार शिवराय, माथ्यावर टिळा, डोक्यावर भगवा फेटा, शिवरायांचा जयघोष करणारी प्रजा आणि गुलालाची उधळण करीत मराठमोळे नृत्य सादर करणाऱ्या..

शोभायात्रा : देखाव्यातून शिवकाळाला उजाळायवतमाळ : घोड्यावर स्वार शिवराय, माथ्यावर टिळा, डोक्यावर भगवा फेटा, शिवरायांचा जयघोष करणारी प्रजा आणि गुलालाची उधळण करीत मराठमोळे नृत्य सादर करणाऱ्या भगिनी हे दृश्य पाहून प्रत्येकाला शिवकाळात गेल्याचाच भास होत होता. निमित्त होते छत्रपती महोत्सवाचे.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेने यवतमाळकरांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत गेलेल्या या शोभायात्रेत शिवप्रेमी जनतेने सहभाग नोंदविला होता. तलवारबाजीच्या नृत्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.महिलांनी भगवे फेटे परिधान केले होते. मराठमोळा साज परिधान करून मराठी नृत्य ठिकठिकाणी सादर केले. शिवकाळातील विविध घटना रेखांकित करण्यासाठी विविध झाँक्या साकारण्यात आल्या होत्या. यामधील आकर्षक वेशभूषेने ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला होता. यातून शिवकाळात वावरत असल्याचाच भास निर्माण झाला.या शोभायात्रेचे शहरातील विविध भागात जंगी स्वागत झाले. शोभायात्रेच्या स्वागताकरिता शहरातील विविध चौकात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. विविध ठिकाणी पाण्यासोबत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिवजयंतीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. (शहर वार्ताहर)