शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: पुसदचे चार तरुण निघाले सायकलने हज यात्रेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:18 IST

पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यात करणार सात हजार किलोमीटर प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क 

प्रकाश लामणेयवतमाळ: पवित्र हज यात्रा आयुष्यात एकदा तरी करावी, अशी प्रत्येक मुस्लीम बांधवांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत असतो. याच प्रयत्नातून पुसदचे चार तरुण चक्क रविवारी सायकलने हजला रवाना झाले. सात हजार किलोमीटरचा प्रवास करून ते सहा महिन्यानंतर सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे पोहोचणार आहेत.इरफान खान महेबूब खान, दौलत खान नासीर खान, शेख अमजद शेख महंमद आणि शेक तौफिक शेख मुनाफ अशी या चार तरुणांची नावे आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता हे चार तरुण हजसाठी पुसदवरून रवाना झालेत. अमरावती, दिल्ली, बैतूल, पाकिस्तान, अफगानिस्तान, इराक, इरान असा प्रवास करीत ते सौदीअरेबियातील मक्का मदिना येथील हज यात्रेला पोहोचणार आहेत. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळात ते सायकल चालवित प्रवास करणार आहे. या तरुणांनी आपल्या सोबत केवळ पाणी, तीन ड्रेस, पासपोर्ट आणि सायकल दुरुस्तीचे साहित्य तेवढे घेतले आहे. सात हजार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी त्यांना तब्बल सहा महिन्याचा वेळ लागणार आहे. मिळेल तिथे भोजन आणि मिळेल तिथे मुक्काम करीत ही मंडळी हजचा प्रवास करणार आहे.पुसदच्या पार्वतीनगरातील इरफान खान हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून इतर तीन जण खासगी वाहन चालक आहेत. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते सायकलने हज यात्रेचा प्रवास करणार आहेत. महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी सायकलने निघणारे ते पहिलेच यात्रेकरू असावेत. हज यात्रेसाठी विजा आणि इतर कागदपत्रांसाठी त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे हे चौघे सायकलनेच सात हजार किलोमीटरचा प्रवास करून पुसदला पोहोचणार आहे. वर्षभर सायकल प्रवास करून पवित्र हजची यात्रा करणार आहे.तीन महिने सरावया तरुणांनी अत्याधुनिक सायकली खरेदी केल्या. या सायकलने त्यांनी तब्बल तीन महिने सराव केला. नागपूर ते पुसद असे ते सराव करीत होते. या सरावातून त्यांना बळ मिळाले आणि हज यात्रेसाठी रवाना झाल्याचे पार्वतीनगर वॉर्डाचे नगरसेवक साकीब शाह यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Haj yatraहज यात्रा