वीरा साथीदार यांचा विश्वास : नृत्य-नाट्य-गीत-संगीत कलाविष्कार, रविवारी होणार समूह नृत्य आणि मुंबई रॉक शोयवतमाळ : यवतमाळ ही कलावंतांची खाण आहे. ‘यवतमाळ फेस्टिव्हल’ ही अभिमानाची बाब असून, प्रतिभावंतांना संधीचं दालन यामुळे उपलब्ध झाले आहे. नजीकच्या काळात मोठे कलावंत या मंचावरून उदयास येतील, असा विश्वास आॅस्कर नामांकित ‘कोर्ट’ फिल्मचे कोर्ट नायक डॉ. वीरा साथीदार यांनी व्यक्त केला. येथील समता मैदानात (पोस्टल ग्राऊंड) आयोजित ‘यवतमाळ फेस्टिव्हल-२०१५’ या महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. तरुणाईला निखळ आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषधी प्रशासन मुंबईचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भावना डाबरे उपस्थित होत्या. मंचावर फेस्टिव्हल आयोजन समितीच्या अध्यक्ष सुनीता काळे, सचिव राखी भगत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अभियंता दीपक नगराळे, डॉ. दिलीप महाले, ज्ञानेश्वर गोबरे, अनिल आडे, किशोर भगत, मंगला दिघाडे, डॉ. सुनंदा वालदे, कलावंत अविश वत्सल, अपूर्वा सोनार, मन्सूर एजाज जोश आदी उपस्थित होते. डॉ. वीरा साथीदार म्हणाले, संधी अभावी प्रतिभावंतांच्या वाट्याला उपेक्षा येत गेली. सामाजिक आणि कलेच्या क्षेत्रातही उपेक्षितांचा हा संघर्ष सुरू आहे. मी कलावंतांपेक्षा अधिक वेळ कार्यकर्ता असल्याने कायम जनतेच्या बाजुने उभा असतो. त्या समाजाचा मी एक कण आहे. १०० वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीला ‘कोर्ट’ने हादरा दिला असल्याचे नमुद करत कोर्ट तुमची स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देते. यापुढे कोणत्याही कलावंताचा आवाज दडपला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला. डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, महिलांना संधी मिळाल्यास त्या काय करू शकतात याच उत्तम उदाहरण म्हणजे हा कलरफुल महोत्सव म्हणता येईल. समता पर्वात वैचारिक व गंभीर वातावरण असतं. मात्र या महोत्सवात निखळ आनंदाचं वातावरण मनाला प्रफुल्लित करणार आहे. येत्या जानेवारीत युवांसाठी वेगळ््या कार्यक्रमाचे आयोजन राहील, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संगीतमय कार्यक्रम डॉ. भावना डाबरे यांनी प्रस्तुत केला. डॉ. प्रशांत डाबरे व त्यांच्या कलावंतांनी गीते सादर केली. यावेळी यवतमाळ आयडॉल फेम सुपरसिंगर प्रोग्रामचे सादरिकरण झाले. ‘सारेगम’चा स्टार यवतमाळ आयडॉल उज्ज्वल गजभार, अतुल शिरे, देवराज, सचिन पेंदोर, निलम इंगोले, आस्तिक राठोड यांनी सुुंदर गाणी प्रस्तुत केली. संबोधी क्रियेशन नेर प्रस्तुत ‘धम्मदिना’ नाट्यकृती सादर करण्यात आली. कलावंत अविश वत्सल, अपुर्वा सोनार यांचा कलाक्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यवतमाळ फेस्टिव्हलची भूमिका आयोेजन समितीच्या अध्यक्ष सुनीता काळे यांनी मांडली. संचालन कैलास राऊत, आभार सिंधूताई धवने यांनी मानले. सूपर सिंगर प्रोग्रामचे संचालन डॉ. जया मनवर, स्रेहल नगराळे यांनी केले. यशस्वीतेसाठी अंकुश वाकडे, मधुकर भैसारे, कवडू नगराळे, राज चव्हाण, डॉ. महेश मनवर, डॉ. अस्मिता चव्हाण, संतोष राऊत, धीरज वाणी, नारायण थूल, प्रा. सुभाष कुळसंगे, घनशाम नगराळे, शांतरक्षित गावंडे, प्रा. हर्षवर्धन तायडे, प्रवीण इंगळे, विनोद बुरबुरे, एन.यु. धांदे, बंडू बोरकर आदींसह यवतमाळ आयोजन समितीच्या प्रिया वाकडे, मंगला दिघाडे, प्रा. डॉ. छाया महाले, माया गोबरे, प्रा. डॉ. सुनंदा वाल्दे, रविता भोवते, जयश्री भगत, अर्चना खरतडे, उज्वला इंगोले, कमलताई खंडारे, सिंधुताई धवने, चारुलता पावशेकर, प्रज्ञा फुलझेले, कुंदा तोडकर, माधुरी आडे, जयश्री पाटील, माधुरी कांबळे, एकता वाणी, स्मिता उके, लोपमुद्रा पाटील, शोभना कोटंबे, प्रा. सविता हजारे, प्रिती गावंडे, डॉ. लिना बन्सोड, वृंदा कांबळे, मीनाक्षी काळे, पद्मा उले, साधना डाखोरे, ज्योत्स्ना मोकळे, वैशाली घोडाम, माया निरांजने, प्रज्ञा भगत, स्वप्नील मिसळे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
यवतमाळ फेस्टिव्हलमधून मोठे कलावंत उदयास येतील
By admin | Updated: October 18, 2015 02:46 IST