शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे १४ कोटी एका ‘स्पेस’पायी गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:54 IST

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील २३९७ शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ३० लाखांची रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे वळती करण्यात आली. मात्र कोड नंबरमध्ये एक स्पेस जादा असल्याने ही रक्कम परत गेली.

ठळक मुद्देसतत १२ दिवस गोंधळ ६६ कलमात अडकलेल्या फाईल होणार दुरूस्त

रूपेश उत्तरवार।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील २३९७ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश होता. त्यांच्यासाठी १४ कोटी ३० लाखांची रक्कम आयसीआयसीआय बँकेकडे वळती करण्यात आली. मात्र कोड नंबरमध्ये एक स्पेस जादा असल्याने ही रक्कम परत गेली.मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील कर्जमाफीची ग्रीन यादी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील २३९७ शेतकऱ्यांचा समावेश होता.या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम पहिल्या टप्प्यात संबंधित बँकेला दिली जाणार होती. त्यासाठी राज्य शासनाने आयसीआयसीआय बँकेकडे तब्बल १४ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम वळती केली. हे पैसे जिल्हा बँकेच्या खात्यात टाकण्यात येणार होते. मात्र आयसीआयसीआय बँकेने ही रक्कम जिल्हा बँकेत जमा करण्यासाठी कोड नंबर डायल केला असता त्यात एक स्पेस जादा असल्याने ही रक्कम जिल्हा बँकेला मिळू शकली नाही. परिणामी ही रक्कम शासनजमा झाली आहे. ही रक्कम परत मिळविण्यासाठी जिल्हा बँकेने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार चालविला आहे. दरम्यान, कर्जमाफी राज्य सरकारच्याच अंगलट येत असल्याचे बघून आता शासनाने नवीन उपाययोजना सुरू केल्या. त्याअंतर्गत कर्जमाफीच्या यादीतील चुका सुधारण्याकरिता नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तसेच मुंबईच्या आयटी विभागाने बँक कर्मचाऱ्यांना मुंबईत खास प्रशिक्षण दिले. यामुळे ६६ कलमात अडकलेल्या फाईली दुरूस्त होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांनी साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या नावाची ग्रीन यादी जाहीर केली. मात्र दुसऱ्याच दिवशी या यादीत घोडचुका झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची तातडीने ‘व्हीसी’ घेण्यात आली. यानंतरही आयटी विभागाला चुका दुरूस्त करता आल्या नाही. परिणामी गेले १२ दिवस गोंधळाची स्थिती होती. अखेर यातून बाहेर पडण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

चुका सुधारण्यासाठी नवीन सॉफ्टवेअरपूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये बँकांना ६६ कलमांमध्ये माहिती सादर करावयाची होती. त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात माहिती भरल्यानंतर काय चुका आहेत, ते कळत नव्हते. आता नवीन सॉफ्टवेअरमध्ये ६६ कलमांतील माहिती दाखल झाल्यानंतर त्यात काय चुका आहेत, याची माहिती तत्काळ मिळण्याची व्यवस्था आहे. त्या दुरूस्त करून कर्जमाफीची फाईल बँकांना पुन्हा दाखल करता येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाने मुंबईत राज्यभरातील बँकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यांना नवीन सॉफ्टवेअरमध्ये ६६ कलमांमध्ये माहिती कशी सादर करायची आणि चुका कशा दुरूस्त करायच्या, याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांनी याद्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.नवीन सॉफ्टवेअरचे बँक कर्मचाऱ्यांना आयटी विभागाने प्रशिक्षण दिले. त्यानुसार याद्या सादर करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.- अरविंद देशपांडेप्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक.