शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: महिनाभरात १६ अल्पवयीन तरुणींचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:57 IST

आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे.

ठळक मुद्देपालकांना मन:स्तापविविध ठाण्यात गुन्हे दाखल, आंधळ्या प्रेमात सोडले घरदार

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंधळ्या प्रेमासाठी जीवापाड प्रेम करणाऱ्या आई-वडिलांना सोडून यवतमाळातून तब्बल १६ अल्पवयीन तरुणींनी पलायन केल्याचे शहरातील विविध ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यावरून पुढे आले आहे. या तरुणींना फूस लावून पळविल्याच्या तक्रारी पोलिसात देण्यात आल्या असून पोलीस अशा ‘बेपत्ता’ तरुणींचा शोध घेत आहे. सोशल मीडिया आणि विविध माध्यमातून प्रेमाचे होणारे उदात्तीकरण आणि आकर्षण यातून अल्पवयीन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेम पाशात अडकत आहे. कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले की, मग त्या कुटुंबावर नको तो प्रसंग उद्भवतो. शिक्षण घेण्याच्या वयात प्रेमाच्या आनाभाका घेत युगुल बेपत्ता होते. सामाजिक बंधने झुगारुन ही मंडळी पलायन करतात. यवतमाळ शहरातील १४ ते १७ वयोगटातील तरुणी आणि १८ ते २५ वयोगटातील तरुण अशाच प्रेमपाशात अडकून घरदार सोडत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही मंडळी आई-वडिलांचा विचारही करीत नाही. मुलगी बेपत्ता झाल्यावर मात्र घराच्यांच्या पायाखालची वाळू सरकते. पालक पोलीस ठाणे गाठून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार देतात.यवतमाळ शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या अशा घटनांची आकडेवारी मोठी आहे. यावरूनच भीषणता लक्षात येते. मार्च अखेरपर्यंत अवधूतवाडी पोलीस ठाण्यातून पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन मुली, लोहारा, ग्रामीण पोलीस ठाणे येथेही अशा तक्रारींची नोंद आहे. विशेष म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलेच प्रेमीयुगुल पसार झालेत, असे नाही तर एक २२ वर्षीय विवाहिताही आपल्या प्रियकरासोबत निघून गेल्याचे पुढे आले आहे. काही प्रकरणात पोलिसांनी तपास करून प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. केवळ आकर्षणातून उचललेले हे पाऊल सर्वांनाच मन:स्ताप देणारे ठरत आहे.

पालकांनो मुलांना वेळीच समजून घ्याअनेक पालक आपल्या मुलांवर नको तितका विश्वास ठेवतात. आमचे मुले तशी नाही, असे सांगतात. परंतु तारुण्य सुलभ मनात काय सुरू आहे, याचा थांगपत्ताही पालकांना लागत नाही. मुलांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रीणीची नावे माहीत करून घेणे गरजेचे आहे. मोबाईल आणि व्हॉटस्अ‍ॅपही तपासण्याची गरज आहे. अन्यथा पालकांवर मन:स्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट