शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:54 IST

शिवछत्रपतींचा जयघोष, भगवे फेटे, झेंडे आणि ढोलताशांचा गजर करणारे जथ्थे.. हे चित्र कुठल्या गडकिल्ल्यावरचे नव्हेतर, यवतमाळच्या शिवतिर्थावर दिसले.

ठळक मुद्देरन फॉर शिवाजी : गडकिल्ले, छायाचित्रे, झाँकीने जीवंत केली शिवशाही, शिवरायांच्या इतिहासाला उजाळा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शिवछत्रपतींचा जयघोष, भगवे फेटे, झेंडे आणि ढोलताशांचा गजर करणारे जथ्थे.. हे चित्र कुठल्या गडकिल्ल्यावरचे नव्हेतर, यवतमाळच्या शिवतिर्थावर दिसले. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साह संचारला होता. तर आदर्श शोभयात्रा जणू ‘राजेंची स्वारी’च ठरली.‘रन फॉर शिवाजी’ शिवमॅराथॉन स्पर्धेने या उत्सवाला अक्षरश: उत्साहाचे भरते आले होते. या स्पर्धेत युवक आणि युवतींचा सर्वाधिक सहभाग पाहायला मिळाला. २२०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पालकमंत्री मदन येरावार आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात केली.सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिव मॅराथॉन स्पर्धा शहरात पार पडली. यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नव्या पिढीला स्वयंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी कराटे स्पर्धा घेण्यात आली. छायाचित्र स्पर्धेमध्ये ‘शिवरायांच्या स्वप्नातील आजचे मावळे’ या विषयावर चित्र रेखाटण्यात आले. तर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातील प्रसंग आणि महापुरूष, संत यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या.‘शिवकालीन गडकिल्ले’ ही अभिनव स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. शिवरायांनी काबिज केलेले गडकिल्ले कसे होते, त्यांची रचना कशी होती हे मांडण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला. यामुळे शिवरायांच्या इतिहासाला उजाळा मिळाला.यवतमाळ आयडॉलच्या धर्तीवर शिवसंगीत सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवसामान्यज्ञान स्पर्धा, शिवनिबंध स्पर्धा, राज्यस्तरीय शिवकाव्य स्पर्धा, विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, नृत्य स्पर्धा, राज्यस्तरीय शिवनाट्य स्पर्धेचे आयोजन छत्रपती महोत्सवात करण्यात आले होते.आयोजन समितीचे प्रमुख डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, सुनिल कडू, प्रवीण भोयर, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, विशाल चुटे, पंकज राऊत, निखिल धबगडे, अंकुश वानखडे, विनोद डाखोरे, महेश ठाकरे, संजय कोल्हे, संतोष जगताप, अमित नारसे, प्रवीण देशमुख, संगीता घुईखेडकर, वैशाली सवई, प्रणिता खडसे, संगीता होनाडे, अर्चना देशमुख, विद्या खडसे आदी कार्यकर्ते झटत आहेत.जिल्ह्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आले. मोटरसायकल रॅली काढण्यात आली.आदर्श शोभायात्रासार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने सोमवारी आदर्श शोभायात्रा काढून एक नवा इतिहास रचला. यामध्ये विविध झाँकी सादर करण्यात आल्या. शिस्तबद्ध पद्धतीने शिवरायांचा जयघोष करणारे शिवप्रेमी पाहायला मिळाले. शहरात विविध ठिकाणी शोभायात्रेचे जंगी स्वागत झाले. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचा समता मैदानात समारोप झाला. आकर्षक देखाव्यांनी शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला. यामुळे ही शोभायात्रा अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.