शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हीसी’तून ऐनवेळी यवतमाळ ‘ड्रॉप’

By admin | Updated: June 28, 2016 02:12 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऐनवेळी

यवतमाळ : शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी आलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऐनवेळी मुख्यमंत्री कार्यालयाने ‘ड्रॉप’ केले. त्यामुळे चिमुकल्यांचा काहीसा विरस झाला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल पाऊण तास ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे निरागस अंत:करण जिंकून घेतले. सीएम सरांचा ‘आॅफ पिरिअड’ अखेर कलेक्टर सरांनाच निभावून न्यावा लागला.२७ जूनपासून विदर्भातील शाळा सुरू झाल्या. नव्या सत्राच्या पहिल्याच दिवशी निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार होते. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आपटी (ता. मारेगाव) आणि जनुना (ता. उमरखेड) येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सोमवारी सकाळीच या दोन्ही शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि काही गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या व्हीसीकरिता पोहोचले. थेट मुख्यमंत्रीच व्हीसी घेत आहे म्हटल्यावर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगलाही उपस्थित झाले. परंतु, व्हीसीची वेळ झाली तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून यवतमाळला ‘कनेक्ट’ करण्यातच आले नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी सीएमओशी संपर्क साधला. मात्र, या व्हीडीओ कॉन्फरन्समधून यवतमाळला ‘ड्रॉप’ करण्यात आल्याचे ऐनवेळी कळविण्यात आले.मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी १०० किलोमीटर ओलांडून आलेल्या विद्यार्थ्यांचा काहीसा विरस झाला. मात्र, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून लगेच संवाद सुरू केला. त्यांच्या शाळेशी संबंधित प्रश्न विचारून गप्प मुलांची कळी खुलविली. आपटी, जनुनाच्या शाळेने राबविलेली वृक्षदिंडी, पुस्तकभिसी अशा उपक्रमांचा उल्लेख करीत जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल पाऊण तास विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. सीईओ दीपककुमार सिंगला यांनीही पूर्ण वेळ देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह कायम ठेवला. ‘मोठे होऊन काय बनाल?’ या प्रश्नावर डॉक्टर, इंजिनिअर अशी उत्स्फूर्त उत्तरे आली. सौरभ बावणे या आठवीच्या मुलाने मात्र तडक उत्तर दिले, ‘सर, मला तुमच्यासारखे कलेक्टर होऊन गरिबासाठी काम करायचे आहे.’ ज्या शाळांनी लोकसहभागातून डिजिटल क्लासरूम सुरू केल्या आहे, तेथे लवकरच सोलर सिस्टिम देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशी सीएम सरांचा पिरिअड आॅफ झाला, तरी जिल्हाधिकारी-सीईओ यांनी विद्यार्थ्यांचा ‘मुड आॅफ’ होऊ दिला नाही, हे विशेष! (स्थानिक प्रतिनिधी) शिक्षण विभागाचा पाहुणचार४जिल्हाधिकारी कार्यालयातील संवाद आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाकडून विविध पुस्तके, शब्दसंग्रह भेट देण्यात आली. नव्या सत्रासाठी शुभेच्छांसह जेवणही देण्यात आले. आपटी येथील सौरभ बावणे, यश ठमके, साहील देऊळकर, प्राची थुटे, वैष्णवी चिंचुलकर, गायत्री बावणे, जनुना येथील प्रतीक्षा धोंगडे, साक्षी कांबळे, योगीता राठोड, नितीन राठोड, विशाल राठोड, प्रदेश धुमारे हे विद्यार्थी आणि मुख्याध्यापक भोसले, दिलीप भोयर, संदीप कोल्हे, के. बी. पठाण हे शिक्षक सहभागी होते.