शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:00 IST

यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देश्रेया बाजोरिया अव्वल जिल्ह्याचा निकाल अमरावती विभागात तिसऱ्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला. यंदा ३१ हजार ६०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.यवतमाळ येथील श्रेया संजय बाजोरिया या विद्यार्थिनीने ९५.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. ती जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील मूळ रहिवासी आहे. तर याच शाळेच्या साक्षी हरीश जाधवाणी या विद्यार्थिनीने ९४.१५ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेतून पहिला क्रमांक पटकाविला आहे. अभ्यंकर कन्या शाळेची प्रगती सुखदेव भरणे ही विद्यार्थिनी ८९.३८ टक्के गुणांसह कला शाखेतून पहिली ठरली आहे.

जिल्ह्याचा निकाल सुधारलामागील वर्षीपेक्षा यंदा यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सुधारला आहे. गेल्या वर्षी केवळ ८६ टक्के निकालासह यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात ढांग होता. यंदा ९१.८५ पर्यंत निकालाची टक्केवारी वाढली असून विभागातील पाच जिल्ह्यात यवतमाळ तिसºया क्रमांकावर पोहोचला आहे.

जिल्ह्यात महागाव टॉप तर मारेगाव ढांगयंदा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत २९ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे २०६५ विद्यार्थ्यांनी यंदा विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. तर १२ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकाविली आहे. तालुकानिहाय टक्केवारी पाहता महागाव तालुक्याने ९६.१९ टक्के निकालासह जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. तर मारेगाव तालुका ७९.६६ टक्के निकाल घेऊन जिल्ह्यात ढांग ठरला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल