शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावमोहिमेत यवतमाळ जिल्ह्याची कासवगती कायम

By admin | Updated: June 6, 2014 00:13 IST

सहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील १२0६ पैकी ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहे. तंटामुक्तीची टक्केवारी जवळपास ४0 टक्के इतकी आहे. अद्यापही ६0 टक्के ग्रामपंचायती तंटामुक्तीच्या प्रतीक्षेत असून

पुसद : सहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील १२0६  पैकी ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहे. तंटामुक्तीची टक्केवारी जवळपास ४0 टक्के इतकी आहे. अद्यापही ६0 टक्के ग्रामपंचायती तंटामुक्तीच्या प्रतीक्षेत असून तंटामुक्तीत यवतमाळ जिल्ह्याची गती कासवाप्रमाणे असल्याचे दिसते. लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात तंटामुक्तीचे प्रमाण ९0 टक्के इतके आहे, हे विशेष. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात १५ ऑगस्ट २00७ पासून आतापर्यंंत जिल्ह्यातील १२0६ ग्रामपंचायतींपैकी ४६१ ग्रामपंचायती शासनाकडून तंटामुक्त घोषित झाल्या आहेत. तंटामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने विकास कामांसाठी पुरस्कार निधी यापूर्वीच प्रदान केला आहे. यवतमाळ जिल्हा हा मागासलेला असून १६ तालुक्यांमध्ये विभागलेला विस्तीर्ण जिल्हा आहे. जिल्ह्यातील ४0 टक्के ग्रामपंचायती अर्थात ४६१ ग्रामपंचायती तंटामुक्त करून पोलीस प्रशासनाने मिळविलेले यश हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अभूतपूर्व आहे. मात्र अद्यापही ६0 टक्के अर्थात ७४५ ग्रामपंचायती तंटामुक्त होणे बाकी असल्याने तंटामुक्त गाव मोहीम जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. २0१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील २६८ ग्रामपंचायतींनी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभाग घेतला असून ५ जून ते ५ जुलै १४ च्या कालावधीत तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने अंतर्गत मूल्यमापन करावयाचे आहे. त्याअंतर्गत कळंब पोलीस स्टेशन पाच ग्रामपंचायती, बाभूळगाव २0, वडगाव जंगल - ५, वणी १६, मारेगाव १५, पाटण नऊ, मुकुटबन १0, शिरपूर ११, पांढरकवडा १४, घाटंजी ५, राळेगाव २७, वडकी १0, पारवा १0, दारव्हा ५, नेर ८, आर्णी ५, दिग्रस ५, पुसद शहर ८, पुसद ग्रामीण १0, उमरखेड १0, महागाव २४, बिटरगाव ५, पोफाळी ५, खंडाळा ५, दराटी पोलीस स्टेशनमधील दोन ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशिक्षण कार्यशाळेचे अध्यक्ष तथा अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेला जिल्ह्यातील तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी, पंचायत समिती सभापती उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव मोहीम कार्यक्षमपणे सुरू ठेवण्यासाठी सर्वांंनी एकदिलाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)