यवतमाळ - कळंब तालुक्यातील आमला आणि निंबगव्हाण येथे वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.चंदा शंकर रामगडे (६०), त्यांची मुलगी तेजस्विनी शंकर रामगडे (२५) आणि मधुकर पुरुषोत्तम ठोंबरे (३०) सर्व रा.आमला अशी मृतांची नावे आहे. चंदा आणि तेजस्विनी या मायलेकी मक्त्याच्या शेतात कामाला गेल्या होत्या. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने दोघींचाही मृत्यू झाला तर मधुकर गावानजीकच्या एका शेतात कामाला गेला असताना वीज कोसळून ठार झाला. तसेच कळंब तालुक्यातीलच निंबगव्हाण येथे वीज कोसळून एक महिला ठार तर एकजण गंभीर जखमी झाली.
यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 17:11 IST