शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ पालिकेचा अर्थसंकल्प काल्पनिक उत्पन्नावर आधारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:11 IST

नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले.

ठळक मुद्दे१८५ कोटींची शिल्लक : अध्यक्षासह सभापतींनी नोंदविला आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले. यावर नगराध्यक्षांसह सभापतींनी आक्षेप नोंदविला.नगरपरिषदेने २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प तयार केला. यात विविध अनुदानासह ४११ कोटी ९८ लाखांची तरतूद दाखविली. यापैकी १८५ कोटी ८६ लाख रुपये नगरपरिषदेची शिलकी दाखविली. मूळात प्रत्यक्ष उत्पन्नाबाबत ठोसपणे कुठेच उल्लेख नाही. मालमत्ता करातून २३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र आठ महिन्यात केवळ तीन कोटी ५९ लाख कर वसुली झाली. ७७ लाखांचा शिक्षण कर शासन जमा होणार आहे. दैनिक बाजार वसुलीतून ५५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. आत्तापर्यंत केवळ २४ लाख २२ हजार वसुली झाली. आठवडीबाजारातून २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना केवळ चार लाख ७९ हजारांची वसुली झाली. गाळे भाड्यातून दोन कोटींचे उत्पन्न प्रस्तावित होते. त्यापैकी केवळ ५३ लाख वसूल झाले.आर्थिक स्त्रोतात मोठ्या प्रमाणात घट झाली असताना प्रशासनाने १८५ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाचा जावईशोध लावला. यात ९० कोटींचे उत्पन्न टीबी हॉस्पिटलच्या जागेतून दाखविले. ही जागा नगरपालिकेकडे अद्याप हस्तांतरितच झाली नाही. राज्य शासनाला या जागेच्या मोबदल्यात ३६ कोटी रुपये नगरपालिकेला देणे बाकी आहे. त्यानंतरही ९० कोटींच्या उत्पन्नाचा समावेश अर्थसंकल्पात आहे. याहीपेक्षा मजेशीर बाब म्हणजे पालिका अमृत योजनेसाठी ४० कोटींचे कर्ज घेणार असून हे कर्ज मंजूर होण्याअगोदरच प्रस्तावित रक्कम शिलकीत दाखविली गेली.याशिवाय ५५ कोटी ८६ लाखांचे विविध योजनांचे अनुदान नगरपरिषदेकडे अखर्चित आहेत. तेसुद्धा शिलकीत दाखविले. वेतन उपदानासाठी सहा कोटी ठेवी स्वरूपात आहे. हीच काय ती जमापुंजी नगरपालिकेकडे आहे. प्रस्तावित अर्थसंकल्पात २०१७-१८ चे खर्च विवरण दिले नाही. त्यामुळे सभापतींनी आक्षेप नोंदविला. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्याकडेच या अर्थसंकल्पाची प्रत मंगळवारी रात्री ८.३० वाजता पोहोचली. मूळात स्थायी समितीच्या सूचनापत्रासोबतच अर्थसंकल्पाची प्रत पूर्वअभ्यासासाठी देणे अपेक्षित होते. यावरून प्रशासन अर्थसंकल्पाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.आरोग्य, शिक्षण, बालकल्याणसाठी वाढीव बजेटप्रस्तावित अर्थसंकल्पात सभापतींनी आरोग्य, शिक्षण व महिला बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेटमध्ये वाढ करण्याची सूचना केली. त्याला स्थायी समितीत सर्वानुमते मान्यता दिली गेली. स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू होती.जागेची मालकी नसताना मुख्याधिकाऱ्यांनी त्यातून उत्पन्न दाखविले. अर्थसंकल्पात नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे व खर्चाचे मूळ विवरण ठेवण्याचे निर्देश दिले आहे. याशिवाय समिती सभापतींच्या सूचनांचाही त्यात अंतर्भाव करण्यास सांगितले.- कांचन चौधरीनगराध्यक्ष, यवतमाळ