शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकीत बिलापोटी पसरणार यवतमाळ शहरात अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:10 IST

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा शॉक : पालिकेकडे पथदिव्यांचे पावणे तीन कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. वारंवार नोटीस बजावूनही नगरपरिषदेने थकीत बिलाची रक्कम भरली नाही.यवतमाळ शहरात २३ हजार ५०० पथदिवे आहेत. शहरातील विविध मार्गावर असलेल्या पथदिव्यांमुळे रात्री शहरात झगमगाट असतो. मात्र या पथदिव्यांचे नगरपरिषदेने बिल मात्र भरले नाही. यवतमाळ नगरपालिका व संलग्नीत लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव आदी परिसरासह संपूर्ण शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी दोन कोटी ८१ लाख ३८ हजार ७७९ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरण कंपनीने नगरपरिषदेला वारंवार विनंती केली. पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस २३ फेब्रुवारीला बजावण्यात आली. त्यासोबतच वीज वितरण कंपनीच्यावतीने मौखिक विनंतीही करण्यात आली. परंतु नगरपरिषदेने वीज बिल मात्र भरले नाही. महावितरणने नोटीसमध्ये दिलेला १५ दिवसाचा कालावधीही निघून गेला. परंतु नगरपरिषद कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी वीज वितरण कंपनी बुधवारी यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळविले आहे. यवतमाळ शहरात ११५ कनेक्शनवरून वीज पुरवठा केला जातो. नगरपरिषदेने बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वीज बिल भरले नाही तर सेक्शन आॅफीसचे कर्मचारी ११५ ठिकाणावरुन पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. यवतमाळ शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाला तर शहरात अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे.यवतमाळ शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. पाईपलाईनसाठीही खोदकाम करण्यात आले. यामुळे शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य नाही. पथदिवे असतानाही खड्ड्यात वाहन उसळून अपघात होत आहे. पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना रात्री वाहन चालविणे कठीण होणार आहे. आता नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.थकीत रक्कम विलीन होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतीकडीलपथदिव्यांचे थकीत असलेले बहुतांश बिल हे नगरपरिषदेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या ग्रामपंचायतींचे आहे. जानेवारी २०१६ मध्ये शहरालगतच्या लोहारा, वाघापूर, मोहा, उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, भोसा या ग्रामपंचायती समाविष्ठ झाल्या. त्यावेळी या ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकीत होते. आता या ग्रामपंचायतीच्या थकीत वीज बिलाचा भार नगरपरिषदेवर आला आहे. विशेष म्हणजे विलिनीकरणापूर्वीच्या यवतमाळ नगरपरिषदेतील वीज बिल नियमित भरले जात असल्याची माहिती आहे. मात्र आता समाविष्ठ ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलापोटी संपूर्ण शहराला अंधारात जावे लागणार आहे.