शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बसस्थानकात प्लॅटफार्म रिकामे, आगार खचाखच भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:30 IST

बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक खचाखच भरलेले, तर प्लॅटफार्म रिकामे. दुसरीकडे आगारात बसेस एका रांगेत लावून. यवतमाळ बसस्थानक व आगारातील सोमवारचे हे चित्र प्रवाशांना वेठीस धरणारे तर, एसटीसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : गर्दीचा दिवस ‘कॅशलेस’, नियोजनाचा ब्रेकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक खचाखच भरलेले, तर प्लॅटफार्म रिकामे. दुसरीकडे आगारात बसेस एका रांगेत लावून. यवतमाळ बसस्थानक व आगारातील सोमवारचे हे चित्र प्रवाशांना वेठीस धरणारे तर, एसटीसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले.नागपूर, अमरावती व इतर काही मार्गावर दर अर्ध्या तासाने बस सोडली जाईल, ही यवतमाळ आगाराची घोषणा फुसका बार ठरली. वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक फेऱ्या रद्द केल्या जात आहे. अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकाची ही परिस्थिती आहे, तर इतर ठिकाणच्या आगाराचे चित्र कसे असेल, याचा विचारच न केलेला बरा.बसस्थानकात कार्यरत अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, कामगारांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. मनमर्जी काम सुरू आहे. परिणामी बसफेºया रद्द होणे, उशिराने सुटणे या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. चालक, वाहक बस सोडण्याच्या वेळेवर पोहोचले नाही, आगारातून बस मिळाली नाही यासह इतर कारणे यासाठी सांगितली जातात. सोमवारी तब्बल दहा ते १५ बसफेºयांचे वेळापत्रक कोलमडले होते. काही फेºया रद्द झाल्या. बसअभावी अनेक प्रवाशांनी खासगीकडे धाव घेतली. मोठी गर्दी असतानाही याचा फायदा एसटीला घेता आला नाही. दुपारी १ वाजताच्या सुमारास तर नागपूर-अमरावती प्लॅटफार्मवर एकही बस नव्हती. बाहेरून आलेल्या बसमधून नागरिकांना कोंबून प्रवास करावा लागला. विभाग नियंत्रकांनी मनावर घेतल्यास सर्व सुरळीत होऊ शकते, असे कामगारांमधून बोलले जात आहे.