शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Yavatmal: विधवा परंपरेला फाटा देत केले मुलावर अंत्यसंस्कार, बुरसट विचारांना दिली तिलांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 16:50 IST

Yavatmal News: घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले की, अंत्यसंस्काराच्यावेळी त्याच्या पत्नीचे कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे, मंगळसूत्र तोडणे, आदी मनस्ताप देणारे सोपस्कार करून त्या महिलेला वैधव्य बहाल करण्याची परंपरा तशी जुनीच.

- संतोष कुंडकर यवतमाळ - घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले की, अंत्यसंस्काराच्यावेळी त्याच्या पत्नीचे कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे, मंगळसूत्र तोडणे, आदी मनस्ताप देणारे सोपस्कार करून त्या महिलेला वैधव्य बहाल करण्याची परंपरा तशी जुनीच. यातून तिला होणाऱ्या मानसिक वेदनांची मात्र पर्वा कुणालाच नसते; परंतु, मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील धंदरे कुटुंबीयांनी अशा बुरसट विचारांना नाकारून विधवा परंपरेला फाटा देत निधन झालेल्या मुलावर अगदी साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. यातून त्यांनी समाजापुढे एक आगळा आदर्श ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.

झाले असे की, मांगरूळ येथील गोरखनाथ धंदरे यांचा मुलगा प्रफुल्ल धंदरे (४०) याचे दीर्घ आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्याच्या मागे आई शांताबाई, वडील गोरखनाथ, पत्नी निलिमा, मुलगा शौर्य (१०), मुलगी तपस्या (७), मनोज, समीर हे दोन भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मारेगाव येथे कृषी केंद्र चालविणाऱ्या प्रफुल्लचे निधन झाल्यानंतर धंदरे कुटुंबावर दु:खाचा पहाडच कोसळला. निधनानंतर नागपूर येथून त्याचे पार्थिव मांगरूळ येथे आणण्यात आले.

काकांनी घेतला पुढाकारप्रफुल्ल धंदरे याचे काका मधुकर धंदरे हे नागपूरला वास्तव्याला आहेत. ते राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक आहेत. सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. देहदान, नेत्रदानाच्या चळवळीतही ते सक्रिय आहेत. प्रफुल्लवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाल्यानंतर पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या मधुकर धंदरे यांनी सर्वप्रथम विधवा प्रथेला विरोध केला. असे कुठलेही सोपस्कार न करता अंत्यसंस्कार करण्याचा विचार त्यांनी सर्वांसमोर मांडला. भाऊ गोरखनाथ धंदरे व त्यांच्या कुटुंबीयांतील सर्वांनीच यासाठी सहमती दर्शविली. त्यानंतर प्रफुल्लची पत्नी निलिमा हिच्यावर विधवा परंपरेचे कोणतेही सोपस्कार न करता प्रफुल्लच्या पार्थिवावर अगदी साध्या पद्धतीने मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 सामाजिक दडपणातूनच परंपरेचे जतनअनेक सामाजिक परंपरांना तसा काही अर्थ नसतो; परंतु, तरीही कोण काय म्हणेल, या दडपणातून कालबाह्य झालेल्या परंपरांचे जतन केले जात असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळते. विधवा ही परंपरादेखील त्यातलीच एक परंपरा आहे. सामाजिक टिकेचा धनी कुणी व्हायचे, याच मानसिकतेतून साऱ्या कालबाह्य परंपरांचे जतन केले जात आहे. मात्र, मांगरूळच्या धंदरे कुटुंबीयांनी या कुप्रथेच्या विरोधात केलेल्या बंडाचे पुरोगामी विचारवंत व या विचारांचे समर्थन करणाऱ्यांमध्ये कौतुक होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ