शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

यवतमाळ: पारधी जमातीतील अंजुता झाली एसटी चालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 12:38 IST

नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावर अंजुता इलाहाबाद भोसले ही तरुणी एसटी महामंडळात चालक पदावर नियुक्त झाली.

ठळक मुद्देविदर्भातील पहिली तरुणीमुकींदपूर पारधी बेड्यावर आनंदोत्सव

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रानोमाळ भटकंती, शिकारीवर चरितार्थ यामुळे शिक्षणपासून दूर असलेल्या पारधी समाजातील एका तरुणीने इतिहास घडविला. नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावर अंजुता इलाहाबाद भोसले ही तरुणी एसटी महामंडळात चालक पदावर नियुक्त झाली. पारध जमातीतील ती पहिलीच एसटी चालक तरुणी ठरली आहे.पारधी जमातीमध्ये शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आहे. शिक्षणापासून कोसोदूर असल्याने या समाजात बोटावर मोजण्याइतकेच मुले नोकरीवर आहेत. त्यातही मुलींची संख्या तर नगण्यच. मात्र अंजुता त्याला अपवाद ठरली. शिक्षणाची आवड असलेल्या अंजुताने नेर येथील जिजामाता शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर तिने रमाई आदिवासी आश्रमशाळेतून १२ वी उत्तीर्ण केले. यानंतर जमातीच्या रुढीपरंपरेप्रमाणे तिच्यावर घरुन लग्नासाठी दबाव आला. मात्र स्पष्ट शब्दात नकार देत आपण नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले. यासाठी तिने नेर येथील ओम ड्रायव्हींग स्कूलमधून चालकाचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी तिला मुख्यमंत्री दूत राजू केंद्रे यांनी सहकार्य केले. अशातच एसटी महामंडळाची चालक पदाची भरती निघाली. त्यात तिने अर्ज केला. सर्व फेऱ्या पार करीत तिची प्रशिक्षणासाठी पांढरकवडा येथे निवड झाली. तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती एसटीचे स्टेअरिंग हाती घेणार आहे. एसटी बस चालविणारी पारधी समाजातील ही पहिली तरुणी असावी. एसटी चालक म्हणून तिची निवड झाल्याने नारीशक्ती संघटनेच्यावतीने अंजुताचा नेर नगरपरिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Womenमहिला