शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास पॅकेजमधून यवतमाळचे कृषी महाविद्यालय गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 11:56 IST

यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देअधिवेशनात पळवापळवी ४५ प्राध्यापकांसह ९७ पदांचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळात नवे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव चार महिन्यांपासून शासनाकडे धुळखात आहे. पावसाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित असताना, यवतमाळला टाळून मूल (ता. चंद्रपूर) येथे नवे महाविद्यालय मंजूर करण्यात आले. शिवाय, कृषी विद्यापीठासाठी घोषित केलेल्या ५० कोटींच्या पॅकेजमध्ये यवतमाळच्या कृषी महाविद्यालयाचा साधा नामोल्लेखही टाळण्यात आला. त्यामुळे विदर्भ विकासाच्या नावाने शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केवळ पळवापळवीच झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.२० डिसेंबर २०१७ रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यवतमाळात शासकीय कृषी महाविद्यालय तातडीने सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी राज्यशासनाला निर्देशही दिले होते. ही घोषणा होताच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यवतमाळात महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे (एमसीएईआर) पाठविला. बीएससी कृषी अभ्यासक्रमाच्या ६० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयात ९७ पदे असतील. त्यात ४५ पदे शिक्षकवर्गीय असतील, असा हा प्रस्ताव परिषदेने तातडीने शासनाला मान्यतेसाठी सादर केला.पावसाळी अधिवेशनात प्रस्ताव मंजूर होऊन प्रवेश सुरू होतील, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात अधिवेशनात यवतमाळऐवजी मूल (जि. चंद्रपूर) येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्याने विद्यापीठ प्रशासनही आश्चर्य व्यक्त करीत आहे. मूल येथे अद्याप महाविद्यालयाची जागा, इमारत हे प्रश्न सुटलेले नाहीत. तर यवतमाळात कृषी विद्यापीठांतर्गत कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या निमित्ताने सुसज्ज आणि नवीन इमारत तयार आहे. केवळ शासन मान्यता आणि पदभरती होताच हे महाविद्यालय याच सत्रात सुरू होणे शक्य होते. तरीही यवतमाळला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यपालांची घोषणा वाऱ्यावरराज्य शासनाने अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार कोटींचे विशेष पॅकेज घोषित केले. त्यात अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली. या ५० कोटींच्या पॅकेजमधूनच यवतमाळऐवजी चंद्रपूर जिल्ह्यात नवे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मात्र, या पॅकेजमध्ये खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी घोषित केलेल्या यवतमाळच्या कृषी महाविद्यालयाला स्थान देणे सरकारला का अशक्य झाले, असा प्रश्न यवतमाळात उपस्थित केला जात आहे.

पुढच्या अधिवेशनात बघूकृषी विद्यापीठाने आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने यवतमाळच्या शासकीय कृषी महाविद्यालयाबाबत सर्व कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केली आहे. महाविद्यालयासाठी इमारतही तयार आहे. केवळ पदभरती करून प्रवेश प्रक्रिया सुरू करणे बाकी आहे. तेवढ्यासाठी पावसाळी अधिवेशनातून सरकारी मान्यता मिळण्याचा सोपस्कार बाकी होता. परंतु, आता यवतमाळच्या महाविद्यालयाबाबत पुढच्या अधिवेशनात बघू, असे सांगत शासनाने कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा प्रस्ताव डावलल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती