शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ २३ वर्षे जुन्या नियोजनावरच

By admin | Updated: January 12, 2015 22:58 IST

शहराची वाढती लोकसंख्या, विकसित होणारे नगरे आणि मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाच्या माध्यमातून शहराचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराच्या अ‍ॅक्शन प्लॅनची मुदत संपत आली

नगरपरिषद : शहराच्या जुन्या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ची मुदत संपतेयरूपेश उत्तरवार - यवतमाळ शहराची वाढती लोकसंख्या, विकसित होणारे नगरे आणि मूलभूत सुविधांसाठी नगररचना विभागाच्या माध्यमातून शहराचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराच्या अ‍ॅक्शन प्लॅनची मुदत संपत आली तरी नवीन नियोजन तयार करण्यातच आले नाही. आजही यवतमाळचा विकास १९९२ साली म्हणजे २३ वर्षापूर्वी तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅननुसारच सुरू आहे. त्यातच शासनाकडून प्रस्तावित निधीही मिळाला नाही. परिणामी शहराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसत आहे. यवतमाळ शहराला ऐतिहासिक वारसा आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगल आणि घाटमाथ्यावर शहर वसले आहे. गत काही वर्षांपासून यवतमाळ शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यातच लगतच्या ग्रामपंचायतींचाही भार नगर परिषदेला सोसावा लागतो. अशा स्थितीत शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे असते. यासाठी नगर रचना विभागाच्या माध्यमातून शहराचा १७ ते २० वर्षासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जातो. यवतमाळ शहराचा अ‍ॅक्शन प्लॅन १९९२ साली तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी १९९८ साली करण्यात आली. त्या वेळी शहराच्या विकासासाठी १३ कोटी ७४ लाख रुपये अपेक्षित होते. मात्र आता १७ वर्ष झाले तरी नवीन कृती आराखडा तयारच करण्यात आला नाही. त्यामुळे शहराच्या शिस्तबद्ध विकासाला खीळ बसली. शासनाकडे विविध विकासाच्या नावाखाली मागितलेला निधीही नगर परिषदेला पुरेसा मिळाला नाही. १९९८ मध्ये लागू झालेल्या अ‍ॅक्शन प्लॅननुसार यवतमाळ शहरात एक हजार १६ चौरस हेक्टर जागा नियोजनासाठी उपलब्ध आहे. त्यात १६७ चौरस हेक्टर जमीन नगरपरिषदेच्या मालकीची, आठ चौरस हेक्टर सार्वजनिक उपयोगाची, १५० चौरस हेक्टर रस्ते आणि रेल्वेसाठी २७ चौरस हेक्टर, बगीचे आणि खेळाच्या मैदानासाठी १५८ चौरस हेक्टर, कृषी उपयोगासाठी गृहित धरण्यात आली होती. तसेच यवतमाळ शहरात १५४ चौरस हेक्टर जमीन व्हॅकंट बॅरल (पडिक जमीन) आणि २० चौरस हेक्टर जमीन नाले आणि तलावांची आहे. या ठिकाणी विकास करण्यासाठी नगरपरिषदेने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला होता. दरम्यानच्या काळात विकास आणि नियोजनाकडे निधी अभावी दुर्लक्ष झाले. मात्र नगर रचना विभाग नगरपरिषदेला सूचना करणार असून येत्या काही वर्षात अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाईल.