शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ येथे काटा कुस्त्यांची दंगल; जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:35 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी व  लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देराहुल व गजानन पहेलवानांना संयुक्त विजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व  लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात रविवारी रात्री १ वाजेपर्यंत प्रेक्षकांच्या चिक्कार गर्दीत काटा कुस्त्या रंगल्या. देवठाणाचा (हिंगोली) गजानन भोयर पहेलवान व अकलुजचा अनुभवी मल्ल राहुल लवटे यांच्यात प्रथम क्रमांकासाठी लढत झाली. या तूल्यबळ मल्लांची ‘नुराकुश्ती’ तब्बल ३५ मिनिटानंतरही डाव-प्रतिडाव न टाकताच बरोबरीत सुटल्याने या मल्लांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिल्ली, भिलाई, खंडवा, हरियाणा, परभणी, हिंगोली, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, पुणे, सातारा, अमरावती आदी ठिकाणच्या ४०० हून अधिक पहेलवानांनी हजेरी लावली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे आदी उपस्थित होते.४१ हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी अकुलजचा संतोष जगताप व पुण्याचा मेघराज शिंदे यांच्यात लढत झाली. या लढतीत अकुलजच्या संतोष पहेलवानाने आठ मिनिटे रंगलेल्या कुस्तीत मेघराज पहेलवानला झोळी डाव टाकून बाजी मारली. तिसºया क्रमांकाच्या ३१ हजार रुपयांच्या बक्षिसासाठी ज्ञानेश्वर पहेलवान (मंगरूळपीर) व योगेश जाधव (अकलुज) यांच्या २० मिनिट डाव-प्रतिडाव रंगले. मात्र कोणीही चित होऊ न शकल्याने लढत बरोबरीत सुटली.या दंगलीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी व सर्वाधिक दाद मिळालेली चौथ्या क्रमांकाची कुस्ती झाली. दिल्लीच्या आखाड्यात सराव करणारा निर्मल पहेलवान (जलालाबाद) व मिथून चव्हाण (अकलुज) यांच्यात चित्तथरारक कुस्ती झाली. सामन्याच्या तिसºया मिनिटात मिथून पहेलवानने निर्मल पहेलवानला मातीत लोळवून त्याच्यावर सवारी केली. सवारी डावाने विजय मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिथून पहेलवानाचे सर्व डाव, युक्त्या निर्मल पहेलवानाने हाणून पाडल्या. तब्बल २७ मिनिटानंतर निर्मल पहेलवानाने सवारी तोडून विजेच्या चपळाईने मिथून पहेलवानला अस्मान दाखवून या कुस्तीत विजय मिळविला.प्रेक्षकांनीही स्वयंस्फूर्ततेने विजयी पहेलवानावर बक्षिसांचा वर्षाव केला. पाचव्या क्रमांकाच्या २१ हजार रुपयांच्या लढतीत अकलुजच्या तात्या जुमळेने पुण्याच्या धर्मा शिंदे पहेलवानाचा केवळ चार मिनिटात पट काढून विजय मिळविला. सचिन वाघ (अकलुज) विरूद्ध अरुण गांगुर्डे (पुणे) यांच्यातील १५ हजार रुपये बक्षीस असलेली सहाव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. दहा हजार रुपयांच्या सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत गेंडा पाटील (जालना) याने बाजी मारली. त्याने पुसदच्या उमेश पहेलवानला चितपट करून कुस्ती जिंकली. सात हजार रुपयांच्या कुस्तीत हनुमान पहेलवान (हिंगोली) याने अतुल भोसले (अकलुज) या पहेलवानाला केवळ एका मिनिटात अस्मान दाखवून विजय मिळविला.महेबूब पहेलवान (वाशिम) याने पाच हजार रुपयांच्या नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत भिलाईच्या शिवशंकर पहेलवानला खडी बांगडी डावाने मात करीत दिमाखदार विजय मिळविला. तीन हजार रुपये बक्षीस असलेल्या कुस्तीसाठी राजू पहेलवान (वाºहा) विरूद्ध विनोद पहेलवान (वाशिम) यांच्यात लढत झाली. या लढतीत विनोद पहेलवानने राजू पहेलवानला धोबी पछाड करून कुस्ती जिंकली. दोन हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती रसिक पहेलवान (माळकिन्ही) याने जिंकली. या स्पर्धेत एक हजार रुपयांच्या पाच कुस्त्या व १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपये रोख असलेल्या अनेक कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. कुस्तीचे धावते समालोचन अरुण जाधव यांनी केले. पंच म्हणून अनिल पांडे, उद्धव बाकडे, मोहम्मद शकील, राजू किनाके, धनंजय लोखंडे यांनी काम पाहिले.विजय दर्डा यांनी वाढविला उत्साहलोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी कुस्ती स्पर्धेला भेट देऊन मल्लांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी कुस्तीचा जोडही लावला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, हनुमान आखाड्याचे संचालक तथा लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार बक्षीसअंतिम सामन्यात संयुक्तपणे विजयी झालेल्या गजानन पहेलवान व अ‍ॅड. राहुल लवटे यांना ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, प्रशांत बाजोरिया, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, मनिष पाटील, डॉ. टी.सी. राठोड, बबलू देशमुख, दीपक ठाकूर, कादिर मिर्झा, रवी ढोक, रामेश्वर यादव, हिरा मिश्रा, नितीन जाधव, रावसाहेब पालकर, प्रभाकर गटलेवार, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. सी.बी. अग्रवाल, प्रकाश मिसाळ, डॉ. अजय केशवानी, अब्दुल जाकीर, विक्की राऊत, कैलास वानखडे, अभय राऊत यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे बक्षिसाची रक्कम दोनही विजयी मल्लांना देण्यात आली.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डा