शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

यशश्रीला राज्य कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

By admin | Updated: January 25, 2017 00:34 IST

येथील ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्याच्या महिला मल्लांनी पुणे येथील आळंदी शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला कुस्ती

हनुमान आखाड्यातर्फे गौरव : महिमाची रौप्य पदकाला गवसणी यवतमाळ : येथील ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्याच्या महिला मल्लांनी पुणे येथील आळंदी शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला कुस्ती स्पर्धेत एक सुवर्ण, एक रजत अशा दोन पदकांची चमकदार कामगिरी केली. यशश्री खडसे हिने ५३ किलो वजनगटात फ्री स्टाईल कुस्तीत सुवर्ण पदक, तर महिमा राठोड हिने रौप्य पदक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ४२ संघांनी सहभाग घेतला होता. यवतमाळ जिल्हा कुस्तीगिर संघ तथा श्री हनुमान आखाड्याच्या यशश्री वसंत खडसे, ममता हरिश्चंद्र बालवे, दिव्या ज्ञानदेव खेकडे, महिमा राजू राठोड या मल्लांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. यशश्री खडसे हिने ४३ किलो फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत यजमान आळंदीच्या स्पर्धकाचा सहा विरुद्ध दोन गुणांनी चितपट कुस्तीद्वारे दिमाखदार विजय संपादन करून सुवर्ण जिंकले. यशश्रीने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. महिमा राठोड हिने ४३ किलो ज्युनिअर गटात रजत पदक जिंकले. जिल्हा कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी सर्व महिला मल्लांचा हनुमान आखाड्यात गौरव करण्यात आला. यावेळी प्रताप पारस्कर, नरेंद्र बुटके, प्रभाकर गटलेवार, सुरेश जयसिंगपुरे, दीपक ठाकूर, विठ्ठल भोयर, अनिल लाखकर, विशाल आकोलकर, उद्धव बाकडे, किसन दवारे, पवन पांडे, अमित बागडे, सागर खोब्रागडे, वसंत खडसे, रामेश्वर यादव आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)