शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महागाव येथे कृषी केंद्रांवर धाड

By admin | Updated: June 13, 2017 01:17 IST

शासनाकडून बंदी असलेल्या नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर धाड टाकून ते सील करण्यात आले.

सील ठोकले : नकली बियाण्यांची विक्री, मुडाणा येथेही कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शासनाकडून बंदी असलेल्या नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर धाड टाकून ते सील करण्यात आले. ही कारवाई सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बी. आर. कळसाईत यांच्या नेतृत्वात करण्यात आली. महागाव येथील विनोद पावडे यांच्या मालकीच्या लक्ष्मी कृषी केंद्रामध्ये शासनाकडून बंदी असलेले राशी ६५९ हे बियाण्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. या धाडीत राशी ६५९ चे ४४ पाकिटे आढळून आले. ही पाकिटे जप्त करून या दुकानाला सील ठोकण्यात आले.त्यानंतर महागाव येथून पाच-सहा किलोमिटर असलेल्या मुडाणा येथील गावंडे यांच्या मालकीच्या मीता कृषी केंद्रावरही धाड टाकण्यात येऊन येथून राशी ६५९ चे सहा पॉकीट जप्त करण्यात आले. या परिसरातील इतरही कृषी केंद्रांना भेटी देण्यात आल्या, परंतु त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. उल्लेखनिय म्हणजे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी यवतमाळहून जाऊन कारवाई केली. त्यामुुळे तालुका कृषी विकास अधिकारी नेमके काय करतात, तसेच कृषी विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाचे अस्तित्व काय, हे प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांसह या कारवाईच्या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षही उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी आर. बी. रणवीर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना वरिष्ठांकडून समज देण्यात आली.