पुसद : नववर्षानिमित्त पूस नदीतीरावर आयोजित कुस्तीच्या दंगलीत सोलापूरचा पहेलवान सुनील सेवतकर याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सोलापूरचाच रवी शेनगे द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला. कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पूस नदीतीरावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कुस्ती दंगलीचे उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मणराव जाधव, पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद, बाजार समिती सभापती दिलीप बेडे, ठाणेदार वाघू खिल्लारे, मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाळे, निशांत बयास, कालू पहेलवान, राहुल कांबळे उपस्थित होते. सोलापूरचा सुनील सेवतकर याची लढत दिल्लीचा पवनकुमार याच्यासोबत झाली. रोमहर्षक लढतीत सेवतकर प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला. आखाड्यात ५० च्यावर पहेलवान उतरले होते. त्यात सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, पांढरकवडा, परभणी, नांदेड, दिल्ली, हिंगोली, राहटी, बिजराणी, पळसगाव, पुसद येथील पहेलवानांचा समावेश होता. पहिल्या पाच पहेलवानांना बाबाराव लेव्हेकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ट्रॉफी देण्यात आली. परमेश्वरभैया, राजू दुधे, अभिजित चिद्दरवार, बिपीन चिद्दरवार, सज्जन आडे यांच्याकडून पुरस्कार देण्यात आले. पंच म्हणून कालू पहेलवान, नंदू चौधरी, गणेश भिसे, मनोज पवार, दिनेश ठाकूर, विष्णू पहेलवान, गणेश पहेलवान, विश्वास पहेलवान, खोब्राजी कांबळे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी किशोर पानपट्टे, विशाल कांबळे, मंगेश करण, विष्णू गुद्धटवार, अमोल साखरे, अविनाश कदम, खेमानंद महल्ले, राजू मोराई, नटवर उंटवाल, राहुल सहारे, अभिमन्यू शिंदे, सचिन गायकवाड यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
कुस्ती दंगलीत सुनील सेवतकर अव्वल
By admin | Updated: January 5, 2017 00:16 IST