शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमुक्तीसाठी रस्त्याची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 22:17 IST

खड्डेमय रस्त्यावरून वाट काढताना होणारा त्रास पाथ्रड (गोळे) येथील विद्यार्थिनींनी अनोखे आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.

ठळक मुद्देपाथ्रडच्या विद्यार्थिनींचे आंदोलन : नादुरुस्त रस्त्याने शाळेत जाणे कठीण

आॅनलाईन लोकमतनेर : खड्डेमय रस्त्यावरून वाट काढताना होणारा त्रास पाथ्रड (गोळे) येथील विद्यार्थिनींनी अनोखे आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. खड्ड्यांची पूजा करून अपघात होऊ नये यासाठी धावा करण्यात आला. यानंतर नेर येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे व तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले.या गावातील विद्यार्थिनी वटफळी येथे शिक्षणासाठी जातात. मंगळवारी त्यांनी वटफळी रस्त्याची दुर्दशा आणि होत असलेला त्रास, याविषयी प्रश्न मांडला. शहरातील छोटेछोटे खड्डे लगेच बुजविले जातात. ग्रामीण भागातील मोठमोठे खड्डे का बुजविले जात नाही, असा प्रश्न करून शासनाचे याकडे लक्ष वेधले. त्यांनी खड्ड्यांची पूजा केली. ‘हे खड्डा तुझ्यामूळे कोणता अपघात होऊ नये’ असा धावा करून अनोखे आंदोलन केले.आढावा बैठकीला आलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. सदर रस्त्याची दुरुस्ती दोन महिन्यात केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा अडमाते, तेजस्विनी येंडे, मयूरी गावंडे, लोचना कोळवते, शुभांगी पिल्लारे, संजना गोळे, सोनाली झाडे, पूजा ढोरे, योगीता पिल्लारे, दीपाली पिल्लारे, नम्रता मडकान, सीमा चव्हाण, नीता राठोड, रेश्मा ठाकरे, तनवी कोलावते, निकिता गावंडे आदींनी सहभाग घेतला.पाथ्रड (गोळे) येथे मुख्यमंत्री दूत किरण घोरफडे यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थिनींचे मंडळ तयार करण्यात आले. सावित्रीबाई फुले किशोरी मंडळ, असे त्याला नाव देण्यात आले. दर रविवारी मंडळातील विद्यार्थिनींची बैठक होते. यात करिअर, गावातील स्वच्छता, हागणदारीमुक्ती आदी विषयांवर चर्चा केली जाते. मंडळातील सदस्य दररोज गावातील रस्त्यांची स्वच्छता करतात. योगशिबिर घेतात. मुख्यमंत्री दूत किरण घोरफडे हे ग्रामसभेत ग्रामस्थांना ग्रामसभेचे महत्व सांगतात. यासाठी या गावातील रहिवासी व नेर पंचायत समितीच्या सभापती मनीषा गोळे यांचे सहकार्य लाभत असल्याचे नीलिमा अडमाते यांनी सांगितले.