शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वणीत पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:09 IST

येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.

ठळक मुद्देनिर्गुडा आटली : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे.निर्गुडा नदीतील पाणीसाठा संपल्याने नवरगाव धरणातून पाणी सोडावे लागते. यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या सुरूवातीलाच ३८ टक्के जलसाठा या धरणात शिल्लक राहिला आहे. आता मार्च महिन्यापर्यंत पाणी कसे पुरणार, याची चिंता वाढली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवस पुरेल एवढे १७ दलघमी पाणी नदीत सोडण्याचे आदेश दिले. या १७ दलघमी पाणी वितरणासाठी योजना आखण्याचे सूचविले. त्यामुळे शहरात तीन दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.गेल्या ७ जानेवारीला या नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता १७ जानेवारीला १७ दशलक्षघमी पाणी मिळणार होते. परंतु त्याआधीच नदीतील जलसाठा संपल्याने पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. शहरात सध्या तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. परंतु पाण्यासाठी हाहाकार झाल्याने सोमवारपासून १० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.याबाबत नवरगाव प्रकल्पाच्या एका कर्मचाºयांना विचारणा केली असता, धरणात केवळ ३६.५० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून रविवारी सायंकाळी हे पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. सोडलेले पाणी सोमवारी रात्री १० वाजतापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मंगळवारी पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर शहरात पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणजे नागरिकांना आणखी एक दिवस पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.तीन दिवसांपासून शहरात पाणी पुरवठा नसल्याने नागरिकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. पिण्यालाही पाणी शिल्लक नसल्याने शहरातील पाणी विक्रीचा धंदा जोमाने वाढला आहे. जर जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची ही परीस्थिती आहे, तर एप्रिल व मे महिन्यात नागरिकांना कोठून पाणी मिळणार, याची चिंता वणीकरांना लागली आहे.धरणात पाणी कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनेनुसार शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु नदी कोरडी पडल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष, न.प.वणी