शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:51 IST

माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाºयांवरील हल्ल्याचा निषेध : ३०७ कलम लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते.गुरुवारी सायंकाळी वणी येथील स्वप्नील धुर्वे व अन्य काही जणांनी शिक्षणाधिकारी वंजारी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या अंगावर शाई टाकून मारहाण करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना व जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचाºयांच्या संघटनांनी निषेध केला. आरोपींवर पोलिसांनी विविध कलामान्वये गुन्हे नोंदविले आहेत. मात्र कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) लावावे, अशी मागणी करीत शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट पाहावयास मिळाला.आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी राजेश कुळकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अरुण मोहोड, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, समाधान वाघ, अमित राठोड, रमेश दोडके आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्हा मुख्याध्यापक संघाची निषेध सभाशिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना झालेला मारहाणीचा यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे निषेध नोंदविण्यात आला. शिक्षणाधिकारी कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सचिव भुमन्ना बोमकंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध सभा झाली. यावेळी निरज डफळे, विनोद संगीतराव, विजय विसपुते, इमरान खान, इरशाद पठाण, नागोराव चौधरी, महेंद्र ठाकूर, गायकवाड, धवने, भोयर, चिंचोरे, मांजरे, ताजने, कश्यप, ममता देव, देशपांडे, दहीवलकर, कोकाटे, संगीता डांगे, पांडुरंग साखरकर आदी उपस्थित होते.कास्ट्राईबचे सीईओंना निवेदनयवतमाळ : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने निषेध नोंदविला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांच्या नेतृत्त्वात निवेदन दिले. तसेच जिल्हा परिषदेत झालेल्या सभेतही त्यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे दिगांबर जगताप, रमाकांत मोहरकर यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवून कारवाईची मागणी केली.