शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांच्या मार्गदर्शनासाठी एसपींच्या पुढाकारात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:17 IST

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बेरोजगार युवकांची फळी कारणीभूत आहे. त्यांच्या हाताला काम दिल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते, .....

ठळक मुद्देरोजगारावर भर : गुन्हे प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बेरोजगार युवकांची फळी कारणीभूत आहे. त्यांच्या हाताला काम दिल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते, यासाठी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा उद्योग केंद्र, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून यवतमाळात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.युवकाच्या हाता काम दिल्यानंतर त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातील ओढा कमी करता येऊ शकतो. पोलिसांनी फौजदारी कायदाचा आधार घेऊन प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतर एका मर्यादेपर्यंत गुन्हेगारावर वचक निर्माण करता येतो. याऊलट गुन्हेगारी क्षेत्रात येणाऱ्या युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे रामबाण औषध आहे. बेरोजगारात उद्योजकता विकसित केल्यास ते गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त होतील, यासाठी जिल्हा पोलीसांनीच पुढाकार घेतला आहे. गुरूवारी सायंकाळी सेंट सामाजिक उत्थान संस्थेच्या कार्यालयात रोजगार मार्गदर्शन कार्याशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.एस. मुत्तेमवार, प्रशिक्षण संस्थेचे संचालक एस.बी. मिटकरी, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे समन्वय अधिकारी कुमरे उपस्थित होते. कार्यशाळेत शासनाच्या विविध स्वयंरोजगार योजना, अर्थसहाय, मोफत निवासी प्रशिक्षण यावर मार्गदर्शन केले. युवकांनी परिस्थितीला दोष न देता स्वत:चे कौशल्य विकसित करून स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिस