शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’मध्ये कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:07 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ‘इमरजिंग ट्रेड इन टिचिंग, लर्निंग प्रॅक्टीसेस’ असा या कार्यशाळेचा विषय होता.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ‘इमरजिंग ट्रेड इन टिचिंग, लर्निंग प्रॅक्टीसेस’ असा या कार्यशाळेचा विषय होता. उद्घाटनप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, नाशिक येथील उद्योग सल्लागार व द कॅटालिस्ट बिझनेस कन्सलटंट प्रदीप घारे, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले उपस्थित होते.माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. उद्घाटनपर मार्गदर्शनात प्रदीप घारे यांनी व्यक्तीचे कार्यालयीन काम व त्यासंबंधी कार्यालयीन हितसंबंध याविषयी माहिती दिली. विचार व्यक्त करण्याच्या विविध प्रकाराबद्दल त्यांनी सांगितले.कार्यशाळेत पीआयईटी कॉलेज इंजिनिअरिंग नागपूरचे डॉ. एस.के. देशमुख, नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकचे प्रा. डी.एस. कुलकर्णी, यवतमाळ येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीकचे प्राचार्य एन.एन. शेंडे यांच्यासह प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, डॉ. एस.एम. गुल्हाने, डॉ. अतुल बोराडे, डॉ. आर.एस. तत्त्ववादी, डॉ. यू.व्ही. कोंगरे, डॉ. पी.एम. पंडित, प्रा. जी.एस. काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. ए.पी. पारडे, प्रा. पी.एम. पंडित, प्रा. ए.आर. राठोड, प्रा. पी.एस. रहांगडाले आदींनी शैक्षणिक प्रणालीसंंबंधी मार्गदर्शन केले.संचालन स्वप्नजा राऊत, आभार कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले यांनी मानले. विविध अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा आदींच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा पार पडली. यशस्वीतेसाठी प्रा. अजय राठोड, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंकर, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे आदींनी परिश्रम घेतले.