शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी सफाई कामगारांचा ठिय्या

By admin | Updated: June 23, 2017 01:49 IST

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी गुरूवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले.

नगर परिषदेत कंत्राटदाराची मनमानी : वेतन काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी गुरूवारी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याने भरलेल्या घंटा गाड्या उभ्या करून अभिनव आंदोलन केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा हे आंदोलन पाहण्यासाठी गर्दी केली होती. नगरपरिषदेने झोन एकच्या सफाईचे कंत्राट जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश झुगारून गाडगे महाराज स्वच्छता व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिले आहे. या संस्थेने त्यांच्याकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतनच दिले नाही. यामुळे सफाई कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. गुरूवारी दुपारी रोजंदारी सफाई कामगारांनी पालिकेत कचऱ्याच्या गाड्या भरून आणल्या आणि त्या नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभ्या केल्या. नंतर सर्व कामगारांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक सलीम शहा, शहेजाद शहा, नसीमबानो खान, वैशाली सवाई, विशाल पावडे उपस्थित होते. याच प्रकरणात कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे म्हणून याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. नंतर पालिका प्रशासनाने जाणीपूर्वक अनेक दिवस जबाबच दाखल केला नाही. आता स्वच्छतेबाबत ओरड होत असताना हालचाही सुरू झाल्या. या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यासाठी २८ जूनला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे आता सर्व सबंधितांच्या नजरा नगर परिषदेच्या २८ जूनच्या सभेवर लागल्या आहेत. आदेश पोहचला पाच महिन्यानंतर सफाई कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेत काळ्या यादीत असलेल्या संस्थेला कंत्राट देऊन नये म्हणून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने आदेश दिला. मात्र हा आदेश तब्बल पाच महिन्यानंतर येथील पालिकेत पोहोचला. विशेष म्हणजे त्या काळात मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्याकडेच नगर प्रशासन विभागाचा प्रभार होता. मर्जीतील संस्थेशी आर्थिक संबधातून जाणीवपूर्वक हा आदेश दडवून ठेवण्यात आल्याची आता चर्चा होत आहे. त्याच संस्थेविरूद्ध तक्रारी होत आहे. या संस्थेचे सफाई बील मंजूर करण्यासाठी नगराध्यक्षांपुढे ठेवण्यात आले. त्यावर नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मार्गदर्शन मागितले असून कारवाईची मागणी केली आहे.