शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

जिल्हा कचेरीवर धडकले कामगार

By admin | Updated: December 6, 2014 02:06 IST

आयटकसह ११ केंद्रीय कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने कामगार विरोधी धोरणाचा आज निषेध नोंदविला. यावेळी शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

यवतमाळ : आयटकसह ११ केंद्रीय कामगार संघटनाच्या संयुक्त कृती समितीने कामगार विरोधी धोरणाचा आज निषेध नोंदविला. यावेळी शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.स्थानिक बसस्थानक चौकातुन निघालेला हा मोर्चा विविध मार्गाने मार्र्गक्रमण करीत जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी विविध मागण्याच्या घोषणा फलकांनी यवतमाळकरांचे लक्ष वेधुन घेतले. विविध मागण्याच्या पूर्ततेचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. यामध्ये वाढत्या महागाईला नियंत्रीत ठेवण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्यात याव्या. यासोेबतच बेरोजगारांसाठी रोजगार निर्मीती करण्यात यावी. एनआरएचएम आशा कामगार, आरोग्य खात्यातील अंशकालीन स्त्री परिचर, शालेय पोशन आहार कामगार, विविध क्षेत्रातील संघटीत कामगारांना १५ हजार वेतन देण्यात यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण बंद करण्यात यावे. एनआरएचएम मधिल कर्मचाऱ्यांना कायम सवेत घेण्यात यावे. अंगणवाडीचे खाजगीकरण बंद करण्यात यावे. सर्व कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. ६० वर्षावरील जेष्ठांना १० हजार रूपये मानधन देण्यात यावे. यासह विविध मागण्याचा यामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी आयटकसह इतर संघटनांचा आपापल्या स्तरावर लढा सुरू आहे. परंतु याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. राज्यात व केंद्रात आता सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे आतातरी या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी आहे.यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉमरेट पी.पी. घाडगे, जिल्हा सचिव कॉमरेट दिवाकर नागपुरे, संजय भालेराव, विजय ठाकरे, उषा डंबारे, दिलीप उटाणे, कुसुम ताकसांडे, विद्या मुनेश्वर, ज्योती रत्नपारखी, ममता भालेराव, नारायण बोरकर, संगीत बांगडे, नानासाहेब उईके यांच्यासह अनेकजन यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)