शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्ती राबला रोहयोच्या कामावर

By admin | Updated: June 11, 2014 00:18 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर चक्क मृत व्यक्ती राबल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील चोंढी येथे उघडकीस आला. एवढेच नाही तर करळगावच्या पोस्टातून त्याच्या नावावर पैसेही काढण्यात

पैसेही उचलले : चोंढी ग्रामपंचायतीचा प्रतापआरिफ अली - बाभूळगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर चक्क मृत व्यक्ती राबल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील चोंढी येथे उघडकीस आला. एवढेच नाही तर करळगावच्या पोस्टातून त्याच्या नावावर पैसेही काढण्यात आले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.चोंढी येथील श्रीकृष्ण नागोराव राजूरकर यांनी १५ फेब्रुवारी २००६ रोजी चोंढी ग्रामपंचायतीतून जॉब कार्ड काढले होते. त्यानंतर १४ जून २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षाने १८ एप्रिल २००८ ते ६ जून २००८ असे ४८ दिवस रोहयोच्या कामावर राबल्याची नोंद आहे. या कालावधीत त्यांनी राणाअमरावती जलबंधारा क्र. १, उमरी जलबंधारा क्र. २, उमर्डा जलबंधारा क्र. १ या ठिकाणी रोहयोचे काम केल्याची नोंद आहे. तसेच त्यापोटी त्यांच्या नावावर पाच हजार ३९५ रुपये मजुरी करळगावच्या पोस्टात जमा झाली. ती मजुरीही त्यांनी उचलल्याची नोंद आहे. मृत व्यक्ती कामावर राबला कसा असा संशोधनाचा विषय आहे. गोरगरिबांचे जॉब कार्ड गोळा करून कामावर उपस्थित असल्याची नोंद घेतली जाते. एवढेच नाही तर त्यांच्या नावावर पैसेही उचलले जातात, असाच हा प्रकार दिसून येत आहे.