शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महिलांच्या डोक्यावर हंडा

By admin | Updated: August 22, 2014 00:09 IST

निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पावसाळ्यात पाणीटंचाई : पूस धरणात १६ टक्के जलसाठापुसद : निसर्गाचा असमतोल, लहरी पाऊस आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेचे अपयश, यामुळे पुसद तालुक्यात पावसाळ्यात ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही महिलांच्या डोक्यावरील पाण्याच्या हंड्याचे आझे कमी झाले नाही. यंदा तर अल्प पावसाने सर्वाच्या तोंडचे पाणी पळाले असून पुस धरणातही केवळ १६ टक्के जलसाठा आहे. परिणामी टंचाईची स्थिती आणखी दाहक होण्याची चिन्हे आहे.गेल्या वीस वर्षाचा आढावा घेतला तर पर्जन्यमानात सातत्य राहिलेले नाही. सरासरी एवढाही पाऊस होत नाही. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जानेवारी महिन्यापासूनच नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरड्या पडतात. यावर्षी तर पुसद तालुक्यावर वरुण राजाची वक्रदृष्टी असल्याने १९ आॅगस्टपर्यंत केवळ १७० मिमी एवढाच पाऊस झाला. तालुक्यातील लहान-मोठ्या तलावातील पाणी आटले आहेत. पूस धरणात सुमारे १६ टक्के जलसाठा आहे. शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले. तरीही भयावह परिस्थिती आहे. आगामी उन्हाळ्यात पुसद शहराला टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागेल अशी वेळ येऊ शकते. उन्हाळ्यात पाणी पातळी खोल जात असते पण यावर्षी पावसाळ्यातच झळ सोसावी लागत आहे.दरवर्षी प्रशासकीयस्तरावर पाणीटंचाई निवारण करण्याच्या अनुषंगाने विंधन विहिरी, नळयोजना, अनुदानावर विहिरी यावर लाखो रुपये खर्च केला जाते. पण त्या विहिरी कुणाला मिळाल्या त्यापैकी किती विहिरींना पाणी लागले किंवा नाही किती कोरड्या आहेत व त्याची कारणे शासकीय यंत्रणेने कधी चौकसपणे तपासणी केली का ? असे अनेक प्रश्न पाणीटंचाई अनुषंगाने निर्माण होतात. राज्य सरकार जलस्वराज्य, भारत निर्माण सारख्या योजना राबविते. मात्र मुळात जमिनीच्या पोटात पाणी नसल्यामुळे या योजना निष्क्रीय ठरतात. पुसद शहरासह तालुक्यात आठ ते दहा हजार विंधन विहिरीद्वारे व सात हजार विहिरींद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे. ग्रामीण भागात शेती सिंचनासाठी तर शहरी भागात सांडपाणी आणि पिण्यासाठी पाणी उपसले जात आहे. पावसाळ्यात एक मीटर पाणी मुरण्यासाठी शंभर तास ते शंभर दिवस एवढा कालावधी लागतो. मात्र एवढ्या पाण्याचा उपसा केवळ अवघ्या काही तासात केला जात आहे. यामुळेच पाण्याची भीषणता निर्माण होऊ लागली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंंबासाठी झगडावे लागणार असल्याची शक्यता यावरून दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)