शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे महिलांचा सन्मान

By admin | Updated: March 14, 2016 02:40 IST

समाजातील कर्तृत्वान आणि ज्ञान संपन्न स्त्रियांचा गौरव करणे ही, सुसंस्कृत समाजाची कसोटी असते. असे कार्य करणारी संस्था ही समाजातील आदर्श संस्था असते, ...

पांढरकवडा : समाजातील कर्तृत्वान आणि ज्ञान संपन्न स्त्रियांचा गौरव करणे ही, सुसंस्कृत समाजाची कसोटी असते. असे कार्य करणारी संस्था ही समाजातील आदर्श संस्था असते, असे गौरवोद्गार सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आशा देशमुख यांनी काढले.येथील केशरबाई चाहल प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ महिला संघातर्फे केशरबाई चाहल यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आयोजित कवियित्री प्रा.उर्मिला निनावे, मराठीच्या अधिव्याख्याता डॉ. अन्नपूर्णा चौधरी, गंगाबाई मंचलवार यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. रमेश जलतारे होते. डॉ.देशमुख पुढे म्हणाल्या, ‘स्त्रियांना अजूनही उपेक्षित आणि वंचित जीवन जगावे लागते,’. अगदी सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य असलेल्या काव्यातून स्त्रियांची दु:खे व्यक्त करण्याचा प्रा.निनावे, प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने पी.एच.डी.चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ.अन्नपूर्णा चौधरी, अपंग, असहाय्य रोग्यांना सेवा देणाऱ्या गंगाबाईचा सत्कार करताना प्रा.डॉ.देशमुख गहिवरून आल्या होत्या.या प्रसंगी प्रा.निनावे, डॉ.चौधरी, गंगाबाई यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. प्रा.निनावे, डॉ.चौधरी यांनी सत्काराला उत्तर दिले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ.अजितसिंह यांनी केले. गंगाबाई यांचा परिचय उषा जाट यांनी करून दिला. यावेळी राहुल देवतळे, तन्वीर शेख, चंदाताई परचाके यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)