शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

महिला सरपंचांना मोफत एसटी प्रवास घोषणा हवेत

By admin | Updated: October 1, 2015 02:29 IST

महिलांसाठी आरक्षण जाहीर करून सरकारने महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून दिली. मात्र त्यांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची अद्यापही माहिती दिली नाही.

माहितीचा अभाव : दिग्रसमध्ये लाभच नाहीदिग्रस : महिलांसाठी आरक्षण जाहीर करून सरकारने महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून दिली. मात्र त्यांना मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधांची अद्यापही माहिती दिली नाही. त्यामुळेच अनेक योजनांपासून महिला पदाधिकारी वंचित आहे. दोन वर्षांपूर्वी महिला सरपंचांना मोफत एसटी प्रवास ही घोषणा करण्यात आली होती. परंतु अद्यापही ही योजना कागदावरच दिसत आहे.दिग्रस तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींमध्ये २६ च्यावर महिला सरपंच आहे. त्यांना अद्यापही या योजनेचा फायदा झाला नाही, तर कित्येकांना या योजनेची माहितीसुद्धा नाही. सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताना अत्यावश्यक सुविधांसाठी महिला सरपंचांना स्वत:चे पैसे खर्च करावे लागते. आर्थिक फटका बसू नये म्हणून दोन वर्षांपूर्वी ही घोषणा करण्यात आली. त्यासाठी अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूदही केली होती. महिला सरपंचांना पंचायत समितीत प्रशिक्षण, विविध बैठका, गावविकासांच्या कामांचा आढावा, आरोग्य मेळावे आदी कामांसाठी तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागते. त्यामुळे ही सुविधा महिला सरपंचांसाठी फायद्याची आहे.सरकार अनेक माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक योजना आखल्याचे दाखविले जाते. परंतु आखल्या गेलेल्या योजना फक्त कागदावरच राहतात. त्याची अंमलबजावणी होत नाही. (शहर प्रतिनिधी)