यवतमाळ : दारूड्या पतीशी झालेल्या वादातून मारहाणीत पत्नीच्या हाताने पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी आरोपी महिलेला शुक्रवारी रात्री अटक केली. तिला न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शिल्पा प्रदीप घरत, (२५) रा.शिवाजीनगर लोहारा या महिलेचा पती प्रदीप घरत याच्याशी दसऱ्याच्या दिवशी दारू पिण्यावरून वाद झाला. यात प्रदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी शिल्पा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली.चिमुकले उघड्यावर पित्याच्या दारूच्या व्यसनातून झालेल्या वादात पित्याचा मृत्यू झाला तर त्या आरोपात माता कोठडीत गेली. त्यामुळे चार वर्षाचा सत्यजीत आणि सात वर्षाची भूमिका उघड्यावर आले आहे. कायदेशीर प्रक्रियेत खरी शिक्षा या चिमुकल्यांना मिळत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
‘त्या’ महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Updated: October 23, 2016 01:56 IST