लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लिफ्टखाली अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या धक्कादायक घटनेनंतर या महिलेची शुक्रवारी ओळख पटली आणि आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली. उपचारासाठी आलेली ही महिला तब्बल महिनाभरापासून बेपत्ता असल्याची बाब कुटुंबीयांकडून उघड झाली.पंचफुला भीमराव चव्हाण (४५) असे या महिलेचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होती. पंचफुला काही दिवसांपूर्वी उपचाराकरिता येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. मात्र नंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्याच लिफ्टखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. त्यासंदर्भात पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांना ओळख पटविण्यासाठी बोलावले असता, त्यांनी पंचफुलाचा मृतदेह ओळखला. मात्र तिने आत्महत्या केली की ती लिफ्टमध्ये पडल्याने तिचा मृत्यू झाला, याबाबत अस्पष्टता कायम आहे. पोलीस यंत्रणा अधिक तपास करीत आहे. शुक्रवारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान १८ जानेवारी रोजी या महिलेला कुटुंबीयांनी उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले होते. मात्र तपासणी झाल्यानंतर ती बेपत्ता झाली. मात्र बेपत्ता झालेली ही महिला इतके दिवस मेडिकलच्या लिफ्टखाली असल्याची बाब कुणाच्याही लक्षात कशी आली नाही, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
लिफ्टखाली दगावलेली महिला होती बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST
पंचफुला भीमराव चव्हाण (४५) असे या महिलेचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होती. पंचफुला काही दिवसांपूर्वी उपचाराकरिता येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. मात्र नंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्याच लिफ्टखाली एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. त्यासंदर्भात पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांना ओळख पटविण्यासाठी बोलावले असता, त्यांनी पंचफुलाचा मृतदेह ओळखला.
लिफ्टखाली दगावलेली महिला होती बेपत्ता
ठळक मुद्देओळख पटली : कुटुंबीयांनी घेतली धाव