शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कळंबमध्ये गर्भपात करताना युवती दगावली

By admin | Updated: June 19, 2016 02:16 IST

गर्भपात करताना झालेल्या अतिरक्तस्रावामुळे युवती दगावली तर प्रियकर युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

प्रियकराची आत्महत्या : डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रारकळंब : गर्भपात करताना झालेल्या अतिरक्तस्रावामुळे युवती दगावली तर प्रियकर युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे कळंब तालुक्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. रंजना मधुकर मेश्राम (१८) बोरीमहल व दुर्वेश दादाराव बठे (२०) रा. रासा अशी मृतांची नावे आहे. दरम्यान, येथील एका डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. दुर्वेश हा रासा येथे जावई विलास नागोराव मस्कर यांच्याकडे मागील दहा-बारा वर्षांपासून वास्तव्याला होता. दरम्यान, त्याचे बोरीमहल येथील रंजना मेश्राम या युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यांचे संंबंध आल्याने रंजनाला गर्भधारणा झाली. ही बाब लक्षात येताच दुर्वेशने रंजनाचा गर्भपात करण्याचे ठरविले. दोघेही मंगळवारी येथील तुंडलवार रुग्णालयात पोहोचले. या ठिकाणी रंजनावर गर्भपातासाठी उपचार करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने तिला यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला डॉ.ज्योती तुंडलवार व डॉ. मोहन तुंडलवार यांनी दिला. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रंजनाला यवतमाळ येथे हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र बदनामीच्या भीतीने तो पूर्णपणे खचला. याच कारणावरून त्याने बुधवारी बोरीमहल ते रासा मार्गावर असलेल्या मांडवकर यांच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. इकडे रंजना मृत्यूशी झुंज देत होती. शनिवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. तुंडलवार डॉक्टर दाम्पत्यांनी बेकायदेशीररीत्या केलेला गर्भपात आणि त्यात दाखविलेला निष्काळजीपणा यामुळे रंजनाचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील मधुकर उदेभान मेश्राम यांनी पोलिसात दिली. प्रकृती गंभीर झाल्याने या डॉक्टरांंनीच तिला यवतमाळ येथे दाखल केले, असे मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. उशिरापर्यंत या प्रकरणी कारवाई सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)