शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूत महिलेला झोपवले जमिनीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:20 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती वॉर्डात महिलांना अमानुष वागणूक मिळते. याच्या अनेक तक्रारी होऊनही समस्या कायम आहे. रविवारी रात्री प्रसूत महिलेला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले. हा प्रकार वॉर्ड क्र.७ मध्ये घडला.

ठळक मुद्देमेडिकलमधील प्रकार : रुग्णांची होते हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती वॉर्डात महिलांना अमानुष वागणूक मिळते. याच्या अनेक तक्रारी होऊनही समस्या कायम आहे. रविवारी रात्री प्रसूत महिलेला चक्क जमिनीवर झोपविण्यात आले. हा प्रकार वॉर्ड क्र.७ मध्ये घडला.पूजा किशोर शिंदे (२०) रा.तिवरंग ता.महागाव या महिलेची नऊ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. तिला पुढील उपचारासाठी वॉर्ड क्र.७ मध्ये दाखल केले. येथे रविवारी रात्री पूजाला पलंगावरून उतरविले. इतकेच नव्हे तर तिला जमिनीवर झोपण्यासाठी बिछाणाही देण्यात आला नाही.मागील काही दिवसांपासून प्रसूतीदरम्यान अमानुष्य वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येत आहे. येथील काही महिला कर्मचारी प्रसवकळा सोसत असलेल्या महिलांशी क्रूरपणे वागतात. सर्वसाधारण कुटुंबातील महिला हा प्रकार निमूटपणे सहन करीत आहेत. ग्रामीण भागातील गरीब, निरक्षर कुटुंबांना तक्रार करणे माहीत नसल्याने त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. प्रसूती वॉर्डात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याने लक्षही दिले जात नाही. बरेचदा महिलांना बेडही उपलब्ध होत नाही. येथील सोयीसुविधांचा विस्तार करण्याची नितांत गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यातील व लगतच्या अमरावती, वाशीम जिल्ह्यातून महिला येथे दाखल होतात.ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रस्तरावर प्रसूतीचे प्रमाण नगण्य आहे. गावपोडावरून आशा स्वयंसेविका मजुरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करतात. त्यांचीही येथील यंत्रणेकडून हेळसांड केली जाते. कामाचा व्याप जास्त असल्याचे कारण पुढे करून तेथे प्रत्येकजण जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेत वावरत असतो. येथे रुग्णांची नेहमी हेळसांड होत असल्याची ओरड असते.