शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहीर अधिग्रहणाच्या पैशासाठी वृद्धेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:27 IST

तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देद्वारकाबाईची व्यथा : पिकाला तिलांजली देऊन पाजले ग्रामस्थांना पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील उमरठा येथील एका महिला शेतकऱ्याची विहीर नेर पंचायत समितीने मागीलवर्षी अधिग्रहीत केली. बारमाही पिकांचे ओलित सोडून त्या माऊलीने ग्रामस्थांना पाणी पुरविले. मात्र आता त्याच माऊलीला विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळविण्यासाठी प्रशासनाच्या दारात भटकंती करावी लागत आहे.तालुक्यातील परजना-उमरठा येथे पाणीटंचाई पाचविलाच पुजलेली आहे. त्यामुळे उमरठा येथील विधवा शेतकरी महिला व्दारकाबाई नथ्थूजी पाढेन यांच्या शेतातील विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ग्रामपंचायत उमरठा, पंचायत समिती नेर व तहसीलदारांच्या संयुक्त मागणीवरून एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या शेतातील विहीर अधिग्रहीत करण्यात आली. त्यापोटी मोबदला देण्याचे ठरले. मागीलवर्षी याच विहिरीवरून परजना गावाला पाणीपुरवठा केला गेला. त्यांनी पिकाचे ओलित बाजूला सारून गावकºयांना पाणी पाजले. त्यांच्या नशीबी पाण्याच्या मोदबल्यासाठी भटकंतीची वेळ आली.व्दारकाबार्इंना एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ या उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा मोबदला मिळाला. मात्र परजना गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवीत असतानाही त्यांना मोबदला मिळाला नाही. यामुळे त्यांनी पाणी बंद करून पिकाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी पुरवठा प्रशासनाने त्यांच्या विहिरीवरील पाणीपुरवठा बंदच करू दिला नाही. परिणामी १ जुलै २०१७ पासून ३१ डिसेंबर २०१७ पर्यत याच विहिरीवरून परजनाला पाणीपुरवठा झाला. त्यामुळे शेतात कोणत्याच पिकाचे ओलित करता आले नाही. या पाणीपुुरवठा मोबदल्यासाठी आता व्दारकाबाई ही विधवा शेतकरी महिला प्रशासनाचे उंबरठे झीजवीत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या विहिरीवरून अद्यापही परजना गावाला पाणीपुरवठा सुरूच आहे.पाढेन कुटुंबावर उपासमारीची वेळगावकºयांना पाणी पाजायचे असल्याने शेतातील उभ्या पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे गेल्यावर्षी व्दारकाबाई यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यातून घरगाडा चालविणे कठीण झाले. प्रशासनाने पाण्याचाही मोबदला दिला नाही. त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ग्रामस्थाांना पाणी देऊन मी कोणता गुन्हा केला, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता त्यांनी मूख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे मोबदल्याची मागणी केली आहे.