शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहरात पाण्यासाठी हाहाकार

By admin | Updated: June 25, 2017 00:18 IST

शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही,

पुरवठा ठप्प : नागरिकांची तारांबळ, नवरगाव धरणातून पाणी सोडण्यास विलंब लोकमत न्यूज नेटवर्क वणी : शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीचे पाणी आटल्यामुळे शुक्रवारी काही भागात पाणी पुरवठा झाला नाही, तर शनिवारी संपूर्ण शहरातीलच पाणी पुरवठा ठप्प होता. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. जून महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू असतानाही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गंभीर बाब ही की, वणी नगरपालिकेने २१ जून रोजी नवरगाव धरणातील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याबाबतस पाटबंधारे विभागाला पत्र दिले होते. मात्र २२ जूनला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वणी शहरातील पाणी समस्येने उग्ररुप धारण केले. २२ जून रोजी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सायंकाळी ४ वाजता वणीतील नदीपात्रात पोहचले. रविवारी सकाळपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती निर्माण झाली होती. यंदाही हवामान खात्याचे सारे अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. अद्याप वणी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी निर्गुडा नदीचे पात्र आटले आहे. गरजेनुसार, नवरगाव धरणातून पाणी मागितले जात आहे. नवरगाव धरणातही केवळ २.५६ दलघमी मिटर जलसाठा शिल्लक असल्याने नजिकच्या काळात पाऊस न आल्यास या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वणी शहरात शुक्रवारी सकाळी व सायंकाळी काही भागात पाणी पुरवठा झाला. काही भागात हा पुरवठा अल्प होता. मात्र शनिवारी सकाळी नळाद्वारे पाणीच आले नाही आणि घरातील पाणीसाठाही संपुष्टात आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या परिसरातील नगरसेवकांना पकडून याबाबत जाब विचारला. लोकांचे समाधान करता करता नगरसेवकांच्या तोंडाला चांगलाच फेस आला. २४ जून रोजी रोहीणी नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने अल्पसा दिलासा दिला. आजवर केवळ १०८ मि.मी.पाऊस कोसळला. या पावसाने मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणात केवळ एक से.मी. पाण्याची पातळी वाढली. मृग नक्षत्रात मात्र फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे स्थिती अधिक बिकट झाली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पिभवन वेगाने होत असून त्यामुळे जलस्तरात घट होत आहे. वणी नगरपरिषदेने आतापर्यंत नवरगाव धरणातून चार हजार दलघमी पाणी घेतले आहे. आता मोजकेच आरक्षित पाणी शिल्लक आहे. संकटांची मालिका मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वणी परिसरात अवकाळी वादळी पावसाने थैैमान घातले. तेव्हापासून वणीच्या जलशुद्धीकरण केंद्रात संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. कधी वीज पुरवठा खंडित तर कधी नदीपात्रात पाणीच नाही, अशी स्थिती अनेकदा उद्भवत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.