शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

तलाठी साजे इमारतीविना

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात.

मारेगाव : स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात. मात्र तालुक्यातील बहुतांश तलाठी साजे व मंडळ कार्यालयांना स्वत:च्या मालकीची सुरक्षित वास्तूच नसल्याने महत्वाचे दस्तऐवज वाऱ्यावर आहे़ या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्ष दिले नाही़ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीपासून देशात तलाठी साजे अस्तित्वात आहे़ तलाठी साजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालये असतात. तालुक्यातील १०९ गावांसाठी तलाठ्यांचे ३१ साजे आहेत. या ३१ साजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात कुंभा, बोटोणी, मार्डी, मारेगाव व वनोजादेवी असे एकूण पाच मंडळ कार्यालये प्रशासनाने निर्माण केले आहे़ परंतु यातील तीन तलाठी साजे सोडून २८ साजे व पाच मंडळ कार्यालयांना अद्याप स्वत:च्या मालकीची इमारतच नाही़महसूल यंत्रणेतील तलाठी हा शेवटचा घटक आहे़ गावपातळीवर शेती संदर्भातील दप्तर सांभाळण्यासह इतरही अनेक महत्वाची कामे तलाठी साजातून होतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे़ तरीही तलाठी साजांना अद्याप स्वत:ची हक्काची वास्तू मिळाली नाही़ इतरांना जागा उपलब्ध करून देणारे तलाठी साजेच स्वत: मात्र जागेअभावी उपेक्षित आहेत. तलाठी कार्यालये बांधावे, यासाठी कुणी आवाज उठविला, असेही आजपर्यंत कधी घडले नाही़ त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्षच दिले नाही़ या बाबीसंबंधात तहसील प्रशासनाकडून अधिक माहिती जाणून घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. त्यात केवळ तालुक्यातील सगनापूर, मारेगाव, जळका या तीन गावातील साजांना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याची माहिती मिळाली़ त्यातही जळका येथील इमारत जीर्ण झाल्याने ती नादुरूस्त आहे़ तालुक्याचे ठिकाण असलेल्या मारेगाव साजाची इमारत जुन्या काळातील चावडी आहे़ पाचपैकी एकही मंडळ कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीत नाही़ नवरगाव, कोलगाव, करणवाडी, नरसाळा, कुंभा, चिंचाळा या सहा साजांनी भाड्याच्या वास्तू कार्यालयासाठी घेऊन भाडे काढल्याची नोंद आहे़ उर्वरित साजे व मंडळ कार्यालये यांचे महत्त्वाचे दस्तऐवज एक तर गावात कुणाच्या घरी ठेवलेले असते, किंवा बहूतांश महत्वाचे दस्तऐवज तलाठी व मंडळ अधिकारी घेऊन जातात, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली़ शासनाचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित होत असताना, या गंभीर प्रकाराकडे कुणीच लक्ष देत नाही़ बऱ्याच तलाठ्यांनी आपल्या घरीच साजा कार्यालये थाटली आहे़ या दस्तऐवजाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने बरेचदा तलाठी फेरफार नोंद, वारस चढविणे, वारस कमी करणे, शेतीचे क्षेत्रफळ ठरविणे, गट सर्वे नंबर बनविणे आदी कामांसाठी मोठा मोबदला मागतात, अशी शेतकऱ्यांकडून नेहमी ओरड होते. जवळ-जवळ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याबाहेर राहतात, ही सुद्धा वस्तुस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)