शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

परवान्याशिवाय दुचाकी सुसाट

By admin | Updated: February 16, 2016 03:46 IST

सध्या हेल्मेट सक्तीने वाहनधारक हादरल्यागत दिसत आहे. परंतु हेल्मेट सोडा अनेकांकडे साधा वाहन चालविण्याचा

पुसद : सध्या हेल्मेट सक्तीने वाहनधारक हादरल्यागत दिसत आहे. परंतु हेल्मेट सोडा अनेकांकडे साधा वाहन चालविण्याचा परवानाही दिसत नाही. विना परवाना सर्रास वाहने चालवून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. हेल्मेट सक्तीसोबतच परवान्याचीही सक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुसद शहरात ३० वर्षापूर्वी काही मोजक्या लोकांकडे दुचाकी वाहन होते. आज शहराच्या लोकसंख्येचे २५ टक्के वाहनधारक आहेत. त्यातही दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. बहुतांश घरी दोन ते चार दुचाकी वाहने दिसून येतात. परंतु त्या घरातील एखाद्याच व्यक्तीकडे परवाना असतो. पुसद शहरातील सुमारे ५० टक्के नागरिकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची माहिती आहे. अलिकडे तर शाळकरी मुलेही भरधाव दुचाकी चालविताना दिसून येतात. १४ ते १६ वयोगटातील ही मुले नियमांना तिलांजली देत वाहन चालवीत असतात. कोणत्याही शाळा महाविद्यालयासमोर शिकवणी वर्गासमोर उभे राहिल्यास अशा दुचाकी चालक मुलांची संख्या अधिक दिसून येते. त्यांना परवाना विचारला तर ते थेट नाही म्हणून सांगतात. वाहनधारकांकडे परवाना आहे की नाही, याची तपासणी कधीही होत नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलीस परवान्याची मागणी करतो. त्यावेळी परवाना नसल्यास दंड आकारून सोडून दिले जाते. परिवहन विभागाच्यावतीने तर कधीच परवाना तपासणी मोहीम हाती घेतली जात नाही. आता हेल्मेटसक्ती लवकरच होणार आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट दिसेल. परंतु त्यातील अर्ध्याधिक लोकांजवळ परवानाच नाही. डोक्यावर हेल्मेट नसले तरी परवाना नसताना वाहन चालविणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. या दुचाकी चालकांमुळे पालकही त्रस्त आहेत. परंतु पालक त्यांना सुट देत असल्याने ही तरुण असे वाहन चालवितात. (तालुका प्रतिनिधी)धूम स्टाईल बाईकर्स४पुसद शहरात महागड्या दुचाक्या मोठ्या प्रमाणात आल्या आहे. जोराने आवाज करत वेगाने पळणाऱ्या दुचाक्या अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवितात. पुसद शहरात काही तरूण अशा दुचाकी भर रस्त्यावर आणि गर्दीच्यावेळी चालवित असतात. यामुळे अनेकदा अपघाताची भीती निर्माण होते. या सुसाट बाईकर्सजवळ परवाना असतो की नाही, हा ही संशोधनाचा विषय आहे. त्यांना कुणी अटकाव केल्यास राजकीय दबावही आण्यास मागेपुढे पाहात नाही.