शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दोषारोपपत्राशिवाय गुन्ह्याला कोर्ट केस म्हणता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 14:29 IST

दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही तोपर्यंत गुन्हा अथवा कोर्ट केस दाखल आहे, असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी एका तहसीलदाराच्या राजकीय सोईने झालेल्या बदलीप्रकरणात दिला आहे.

ठळक मुद्दे‘मॅट’चा निर्वाळादाखल गुन्ह्याचा सोयीने अर्थ लावल्याचे उघड बदलीला स्थगनादेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोषारोपपत्र न्यायालयात सादर होत नाही तोपर्यंत गुन्हा अथवा कोर्ट केस दाखल आहे, असे म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी एका तहसीलदाराच्या राजकीय सोईने झालेल्या बदलीप्रकरणात दिला आहे. या तहसीलदाराच्या बदलीला स्थगनादेशही देण्यात आला.नाशिक येथील तहसीलदार (निवडणूक) गणेश उत्तम राठोड यांची धुळ्याला जिल्हाधिकाऱ्यांचे पीए म्हणून २० फेब्रुवारीला बदली करण्यात आली. ते कार्यमुक्तही झाले. मात्र त्यानंतर २५ फेब्रुवारीला बदलीचा आदेश फिरवून त्यांना अहमदनगर येथे तहसीलदार (सामान्य प्रशासन) म्हणून नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या धुळ्यातील जागेवर अभय महाजन यांना मालेगाववरून (नाशिक) आणण्यात आले. दरम्यानच्या काळात पतीची बदली झाल्याने उपजिल्हाधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नीचीही धुळे येथे विनंतीवरून बदली करण्यात आली होती. गणेश राठोड यांचा हा बदली आदेश फिरविण्यामागे त्यांच्याविरुद्ध दाखल कोर्ट केस-गुन्हा ही सबब पुढे केली गेली. अखेर राठोड यांनी या बदलीला अ‍ॅड.अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये आव्हान दिले.गणेश राठोड यांचे हे प्रकरण २०१५ चे आहे. २०१७ ला मिळकत पत्रिकेचे शासकीय काम करताना दुखावलेल्या एका व्यक्तीने २०१७ मध्ये त्यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फौजदारी प्रकरण दाखल केले. सप्टेंबर २०१८ ला न्यायालयाने त्यावर नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिला. मात्र पोलिसांनी तपास सुरू आहे एवढेच उत्तर त्यात दिले. आजतागायत दोषारोपपत्र दाखल केले नाही. परंतु याच प्रकरणाचा आधार घेत व निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे सांगत सरसकट राठोड यांचा बदली आदेश फिरविला गेला. वास्तविक गुन्ह्याचा निवडणुकीशी संबंध आहे का, याचे वर्गीकरण अथवा चिंतन केले गेले नाही. या प्रकरणात न्या.कुºहेकर यांनी रेकॉर्डची तपासणी केली. त्यावर चार्जशिट नसताना फौजदारी केस दाखल झाली असे समजू नये, असा निर्वाळा देत राठोड यांच्या नगरमधील बदलीला स्थगनादेश दिला व त्यांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांचे पीए म्हणून झालेली बदली कायम केली. तेथे रुजू झालेल्या अभय महाजन यांना चार्ज सोडण्यास सांगितले. या प्रकरणात शासनाच्यावतीने मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मंचेकर यांनी काम पाहिले. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर, अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.चार जिल्ह्यांचे मास्टर ट्रेनरगणेश राठोड यांना नाशिकमध्ये चार जिल्ह्यांचे मास्टर ट्रेनर व एका जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र नंतर त्याच राठोड यांना बदलविले गेले.

टॅग्स :Courtन्यायालय