शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

पत्नीच्या खुनात पतीला जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: June 15, 2017 00:58 IST

अंगणात निद्रेच्या अधीन गेलेल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

किन्हाळाची घटना : चाकूने भोसकले होते लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अंगणात निद्रेच्या अधीन गेलेल्या पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. विजय नारायण राठोड रा. किन्हाळा ता. कळंब, असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. विजय सातत्याने पत्नी अनिताचा छळ करीत होता. तिला नेहमी शिविगाळ करून मारझोड करीत होता. या जाचाला कंटाळून अनिता ३ आॅक्टोबर २०१४ रोजी माहेरी गेली. राग शांत होताच लगेच ती किन्हाळा येथे परत आली. त्याच रात्री सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ती घराच्या अंगणात निद्रेच्या अधीन झाली. अनिता झोपेत असतानाच अचानक विजयने तिच्यावर चाकूने हल्ला करून भोसकले. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनिताचे वडील पुनाजी जाधव यांच्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी विजयविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. सहायक निरीक्षक गजानन खारडे यांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे यांनी प्रत्यक्षदर्शी अनिताच्या आईची साक्ष ग्राह्य मानून आरोपीला जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. निती दवे यांनी बाजू मांडली.