शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

पत्नीचा विळ्याने गळा चिरुन खून

By admin | Updated: September 19, 2016 01:07 IST

चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना महागाव

चिल्लीची घटना : चारित्र्यावर संशय, पतीस अटक, प्रेतासह गावकरी ठाण्यावर महागाव/फुलसावंगी : चारित्र्यावर संशय घेत दारूड्या पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान वंदनाच्या प्रेतासह गावकऱ्यांनी ठाण्यावर धडक देऊन आपला रोष व्यक्त केला. वंदना कैलास चव्हाण (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कैलास प्रल्हाद चव्हाण (३५) असे आरोपीचे नाव आहे. चिल्ली इजारा येथील चव्हाण दाम्पत्य दोन वर्षांपासून रोजगारानिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. कैलास दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पुणे येथे त्रास असह्य झाल्याने वंदना दोन मुलासह चिल्ली येथे चार दिवसापूर्वी आली होती. तिच्या पाठोपाठ पतीही चिल्ली येथे आला. गत चार दिवसांपासून तो पत्नीला बेदम मारहाण करीत होता. मारहाणीच्या भीतीने वंदना तिच्या भावाकडे मुलांसह झोपण्यास गेली होती. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा वाजविला. वंदनाने दरवाजा उघडताच कैलासने हातातील विळ्याने तिच्या मानेवर वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यावेळी तिच्या छातीवरही विळ्याने वार करण्यात आले. वार वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथे रवाना केला. तसेच पती कैलासला जेरबंद केले. पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या मागे आदर्श (१२) आणि यश (१०) वर्ष ही दोन मुले आहेत. वंदनाचा खून झाल्याने गावकरी संतप्त झाले होते. तिचे प्रेत सवना येथून घेऊन गावकरी महागाव पोलीस ठाण्यावर धडकले. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी ठाण्याचे गेट बंद केले होते. बराच वेळ पोलीस ठाण्यापुढे थांबून गावकऱ्यांनी रोष व्यक्त करून मृतदेह चिल्ली येथे आणला. (लोकमत चमू)