शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

वीज अभियंत्यांच्या निलंबनाचा एवढा जळफळाट का ?

By admin | Updated: May 9, 2015 00:10 IST

एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर का होईना न्याय मिळतो. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित ....

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर का होईना न्याय मिळतो. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. मात्र संघटन शक्तीच्या बळावर हा न्यायच नाकारण्याचा प्रयत्न होतोय. आंदोलनाचे अस्त्र उभारुन पुन्हा सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा मनसुबा रचला जातो. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव घेतला नसेल असा एकही ग्राहक जिल्ह्यात सापडणार नाही. मात्र या अनागोंदीला जबाबदार धरुन एखाद्यावर कारवाई झाली तर त्याचा मात्र एवढा जळफळाट का व्हावा असा प्रश्न जिल्ह्यातील तमाम नागरिकांना पडला आहे. चिमणाबागापूर येथील शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन वीज वितरणचे अधीक्षक अभियंता आणि दोन उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले. नियमित वीज बिल भरणाऱ्या अमरलाल मनिहार यांच्यावर वीज चोरीचा आळ घेतला. याचा जबर मानसिक धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा ठपका ठेवत तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. शेतकऱ्याचा गेलेला जीव परत येणार नाही, हे मान्य आहे. मात्र या कारवाईचा धडा इतर अधिकारी घेतील, याच उद्देशाने तिघांचे निलंबन करण्यात आले. मात्र आपल्या संघटन शक्तीच्या बळावर आता निलंबन मागे घ्यावे यासाठी अभियंत्यांंपासून कर्मचारी रस्त्यावर उतरण्याची भाषा बोलत आहेत. वरिष्ठ अधिकारीच निलंबित झाल्याने त्यांच्या संरक्षणासाठी सर्वच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. वीज वितरण कंपनीच्या विविध संघटना एकत्र आल्यात, कृती समिती स्थापन करून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला. आता कामबंद आंदोलनाची तयारी सुरू आहे. याच प्रकरणात एखादा कनिष्ठ कर्मचारी निलंबित झाला असता तर वीज वितरणच्या या कृती समितीने असा दबाव आणला असता काय?, त्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी सर्व जण उभे राहिले असते काय?, येथे वरिष्ठच निलंबित झाल्याने सर्व एकत्र झाले आणि संघटन शक्तीतून आपल्या ‘कर्तव्यावर’ पांघरुन घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकारने वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकावेयवतमाळातील वीज अभियंत्यांच्या निलंबनाच्या विरोधात अभियंता संघटनेने संपाचे (काम बंद) हत्यार उपसले आहे. यवतमाळातून सुरू झालेला हा संप राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने निलंबन मागे न घेता हा संप चिरडून टाकावा अशी रास्त अपेक्षा शेतकरी व नागरिकांची आहे. संपावर असलेल्या या वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन सरकार तारखेवर त्यांच्या खात्यात जमा करणार याची जाणीव असल्याने ही यंत्रणा अगदी बिनधास्त सरकारच्याच विरोधात रस्त्यावर उतरली आहे. वीज अभियंत्यांच्या निलंबनाच्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या निर्णयाचे जिल्हाभरात जोरदार स्वागत होत आहे. सरकारने ऊर्जाच नव्हे तर कोणत्याही खात्याच्या अशा (हलगर्जीपणानंतर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात) कोणत्याही संप-आंदोलनाला भीक घालू नये, एवढीच अपेक्षा सामान्य जनता ठेऊन आहे.