राळेगाव : कपडे घ्यायचे असल्याने ग्रामीण भागातील एक व्यक्ती राळेगावात आला. त्याच्याजवळ पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या नोटा कुणीही स्वीकारत नसल्याने चिल्लर शोधण्यासाठी त्याने संपूर्ण बाजारपेठ पालथी घातली. अखेर त्याला चिल्लर मिळालीच नाही. शहरात नोटाबंदीचा फटका अनेकांना बसला. पेट्रोलपंपावर या नोटा स्वीकारल्या जाणार होत्या. त्यामुळे याठिकाणी लांबच लांब रांग लागली होती. अखेर पंपावरील शंभरच्या नोटा संपल्या आणि गोंधळ सुरू झाला. पोलिसांना पाचारण करावे लागले. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन मार्केट यॉर्डात आणला. परंतु व्यापाऱ्यांकडून ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा घेण्यास शेतकऱ्यांनी स्पष्ट नकार दिल्याने व्यवहार झाले नाही. दरम्यान १० ते १४ नोव्हेंबरपर्यंत कापूस व सोयाबीन खरेदी बंदचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी व अडत्यांनी निवेदन देऊन १४ नोव्हेंबरपर्यंत बाजार समितीत शेतमाल विक्री होणार नाही, अशी मागणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)वाढोणात हजारला नऊशेराळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे बंद झालेल्या नोटांच्या व्यवहारात मोठी उलाढाल झाली. एक हजार रुपयांची नोट द्या, नऊशे रुपये घ्या आणि ५०० रुपयांची नोट देऊन ४५० रुपये घ्या असा व्यवहार या ठिकाणी चालला. बंद झालेल्या नोटांविषयी संभ्रम असल्याने अनेक जण या नोटा नुकसान सहन करून चलणात आणण्याचे प्रयत्न करत होते. पेट्रोलपंपावरही ५०० रुपयांचे पेट्रोल घेण्याची जणू सक्ती केली जात होती.
कपड्यासाठी फिरला संपूर्ण बाजारपेठ
By admin | Updated: November 10, 2016 01:36 IST