शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गोतावळ्यातील लढतीत कोण ठरणार बाजीगर?

By admin | Updated: November 15, 2016 01:52 IST

शहर विकासाच्या वल्गना करीत पुढाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. प्रचाराचा धुरळा

नगरपरिषद : राजकीय गुरू-शिष्य आणि सवंगडीच आमने सामने यवतमाळ : शहर विकासाच्या वल्गना करीत पुढाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. मात्र, उमेदवारांच्या भाऊगर्दीत बहुतांश मोहरे एकमेकांचे नातेवाईकच असल्याचे पाहून मतदार चकित होत आहेत. पती-पत्नी, मामा-भाचा, भाऊ-भाऊ, दीर-वहिनी अशा उमेदवारांच्या जोड्याच सध्या दारोदारी मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. राजकारणातील गुरूविरोधात शिष्यही जोर आजमावत आहे. तर कधी काळी जय-विरूची जोडी म्हणून ओळख असलेले आपसात दोन हात करत आहे. यवतमाळ नगरपालिकेमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बाळासाहेब चौधरी हे शिवसेनेच्या तिकिटावर १२-ब आणि १८-अ अशा दोन प्रभागांतून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या अर्धांगिणी आणि माजी नगरसेविका कांचन चौधरी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. प्रभाग ८ आणि २ मध्ये तर चक्क दोन जोड्या रिंगणात उतरल्या आहेत. राजकीय गुरूच्या विरोधात शिष्याने दंड थोपटले आहे. नगरपरिषदेतील माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड स्वत: प्रभाग दोनमधून आणि त्यांच्या पत्नी मालती गायकवाड प्रभाग आठमध्ये रिंगणात आहेत. गायकवाड यांचे बोट धरून नगरपरिषदेची पायरी चढणारे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनीसुद्धा सपत्नीक उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग दोनमध्ये त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका डॉ. अस्मिता चव्हाण यांनी प्रभाग आठमधून रिंगणात आहेत. भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रवीण प्रजापती १०-अ आणि २०-अ अशा दोन प्रभागांतून उभे आहेत. तर त्यांचेच बंधू राकेश प्रजापती यांना भाजपाने प्रभाग क्रमांक १३-ब मध्ये उमेदवारी दिली आहे. याच दोन प्रभागांतून जतनसिंग चव्हाण भाजपाकडून प्रभाग आठमध्ये तर त्यांची वहिनी सविता चव्हाण या राष्ट्रवादीकडून प्रभाग दोनमध्ये लढत आहेत. प्रभाग आठमध्ये मामा-भाचेही आमने सामने आहेत. माजी बांधकाम सभापती पंकज मेश्राम अपक्ष म्हणून त्यांचे मामा नवनीत महाजन यांच्या विरोधात लढत आहे. (शहर वार्ताहर) चार मित्रांत पडली फूट ४यवतमाळ शहरात सर्वाधिक चर्चा आहे ती प्रभाग १८ मधील लढतीची. जय-विरूची जोडी म्हणून पालिकेच्या राजकारणात अनेक वर्ष सत्ता गाजविणारे आता आपसात लढत आहेत. अनेक सुखदु:खात याच चौघांनी कधीच एकमेकाची साथ सोडली नाही. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, माजी उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, माजी बांधकाम सभापती कमलकिशोर मिश्रा आणि विद्यमान नगरसेवक अमोल देशमुख या चौघांची मैत्री सर्वश्रुत होती. पहिल्यांदाच यामध्ये फुट पडली असून बाळासाहेब चौधरी हे अमोल देशमुख यांच्या विरोधात तर दत्ता कुळकर्णींच्या पत्नी विभा यांच्या विरोधात विद्यमान नगरसेविका ज्योती कमल मिश्रा या लढत आहेत. ही लढत कशी होते, यावर शहरवासीयांचेच नव्हेतर जिल्ह्यातूनही लक्ष लागले आहे. पालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच या जोडगोळीने आपसातच लढण्याचा निर्णय घेतला आहे. कुळकर्णी आणि देशमुख भाजपाकडून तर चौधरी, मिश्रा शिवसेनेकडून शड्डू ठोकून आहेत. माजी नगराध्यक्षांत टक्कर ४नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर तयार झालेल्या प्रभाग १२ मध्ये माजी नगराध्यक्षांमध्ये टक्कर आहे. येथे भाजपानेही तितक्याच तोडीचा उमेदवार दिला आहे. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी शिवसेनेकडून, माजी नगराध्यक्ष योगेश गढिया काँग्रेसकडून तर माजी उपाध्यक्ष जगदीश वाधवानी भाजपाकडून रिंगणात आहेत. या तिन्ही उमेदवारांकडे निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रत्येक जण आपल्या वेगळ्या शैलीतील डावपेचांसाठी ओळखले जातात. या तिघांमध्ये काट्याची कुस्तीच रंगणार असून बाजी कोण मारणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. या लढतीतून पुढे आलेली व्यक्तीच पालिकेच्या राजकारणाची बऱ्याच अंशी दिशादर्शक ठरणार आहे.